तुफान मनोरंजन, धडाकेबाज एक्शनसीन आणि प्रेक्षकांना आवडेल अशा मोहक प्रेमकहाणीत गुंफलेली झकास त्रिसूत्री ‘कॅरी ऑन मराठा’च्या निमित्ताने जुळून आली आहे. महाराष्ट्र कर्नाटक मधील सीमाप्रश्न कधी संपुष्टात येईल माहित नाही मात्र त्यात धरतीवर दोन प्रेमीयुगुलांचं फुलणारं प्रेम या सिनेमातून आपल्याला पाहता येणार आहे. महाराष्ट्राच्या मातीतील राजबिंडा तरुण मार्तंड आणि नाजूकसाजूकशी सोनसळी कुसुम यांच्यातील फुलणारं नातं आणि या प्रेमवीरांच्या कुटुंबामधील ड्रामा सिनेमाचा गाभा आहे. अभिनेता गश्मीर महाजनी आणि अभिनेत्री कश्मीरा कुलकर्णी ही फ्रेश जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या समोर येतेय. विशेष म्हणजे या हॅंडसम हिरोच्या वडिलांनी देखील मराठी सिनेसृष्टीचा एक मोठा काळ गाजवला आहे. असे उमदा, देखणे अभिनेता म्हणजे रविंद्र महाजनी. “नंदा आर्ट्स” आणि “वॉरीयर ब्रदर्स मोशन पिक्चर्स” निर्मित ‘कॅरी ऑन मराठा’ सिनेमाचे दिग्दर्शन संजय लोंढे यांनी केले आहे.
नुकताच या सिनेमाचा अंधेरी व्हिटस हॉटेलमध्ये म्युझिक लॉंच सोहळा धुमधडाक्यात पार पडला. नंदा आर्ट्सच्या निर्मात्या सौ. नंदा चंद्रभान ठाकूर आणि वॉरीयर ब्रदर्स मोशन पिक्चर्सच्या सह निर्मात्या शशिकला क्षीरसागर यायांचा देखील हा पहिलाच सिनेमा आहे. विशेष म्हणजे नंदा आर्ट्सचे चंद्रभान ठाकूर आणि नंदा ठाकूर यांच्या नात्याचं काहीसं प्रतिबिंब सिनेमातील मार्तंड आणि कुसुम यांच्या लव्हस्टोरीत प्रेक्षक सिनेमात पाहतील. बॉलीवूडमधील प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक शैल हाडा आणि प्रितेश मेहता या जोडगोळीने कॅरी ऑन या मराठी सिनेमासाठी पहिल्यांदा संगीत दिले आहे. गुरु ठाकूर, अश्विनी शेंडे, मंगेश कांगणे, हृदया शिवा यांनी सिनेमासाठी गीते लिहिली आहे. श्रेया घोषाल, आदर्श शिंदे, वैशाली भैसने-माडे, शैल हाडा, उर्मिला धनगर यांच्या सुमधुर आवाजाचा स्वरसाज सिनेमाला चढला आहे. ऐकताच क्षणी ठेका धरायला लावणारे आणि जोशपूर्ण ‘मल्हारी मार्तंड मल्हार’ आणि ‘जगळगंट’ या गाण्यांसोबत ‘सोबाने सो ऐन्नीरे’ आणि ‘मन जाई जिथं नवलाई तिथं’ ही तरल आणि सुमधुर गाणीसुद्धा श्रोत्यांसाठी आहेत. अरुण प्रसाद यांचे छायांकन, राजू खान, अदील शेख, सूजीत कुमार यांनी नृत्य दिग्दर्शन केले आहे. या सिनेमात मराठी सोबत दक्षिणात्य सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी काम केले आहे. त्यात अरुण नलावडे, अमीन हाजी, करीम हाजी, किशोरी बल्लाळ, देविका दफ्तरदार, उषा नाईक, शंतनू मोघे, समीर खाडेकर, ओमकार कुलकर्णी, अमेय कुंभार आणि सचिन देशपांडे यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. त्याचबरोबर कौशल – मोझेस यांनी डीरेक्ट केले तुफान एक्शन सीन प्रेक्षक नक्कीच एन्जॉय करतील. असा हा कम्प्लीट एंटरटेनमेंटचा पँकेज असलेला सिनेमा येत्या २४ जुलैला महाराष्ट्रात आणि कर्नाटकातील प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा