यळकोट… यळकोट… जय मल्हार, सदानंदाचा यळकोट… या जय घोषात जेजुरी नगरी दुमदुमली. हळदीच्या भंडाऱ्याने पिवळी झालेल्या जेजुरीचे तेज अधिकच वाढले होते. कॅरी ऑन मराठा या आगामी सिनेमातील हिरोच्या एन्ट्रीचे साँग या ठिकाणी शूट करण्यात आले. जेजुरीच्या मातीतच असलेला जोश, उर्जा आणि उत्साह चित्रीकरणादरम्यान पाहायला मिळाला. मराठी सिने सृष्टीत अनेक महत्वाचे बदल घडून येत आहेत… चांगल्या स्क्रिप्ट सोबतचं मराठी सिनेमाला उत्तम दिग्दर्शन तसेच छायांकनही मिळालंय  अनेक नवीन चेहरे इंडस्ट्रीत पदार्पण करत आहेत… बॉलीवूडच्या बरोबरीला मराठी सिनेमा उतरलाय…. असाच एक आगळा वेगळा विषय घेऊन आगामी  कॅरी ऑन मराठा हा सिनेमा जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.  ‘कॅरी ऑन मराठा’ या सिनेमाच दिग्दर्शन संजय लोंढे हे करत असून गश्मीर महाजनी आणि कश्मिरा कुळकर्णी या दोघांच्या प्रमुख भूमिका आपल्याला पाहायला मिळणार आहेत. नंदा आर्ट्स अँड वॉरीअर्स ब्रदर्स मोशन पिचर्स या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती होणार आहे …. जेजुरी येथील प्रसिद्ध मल्हारी मार्तंडाच्या मंदिरात अगदी भावनिक पण धमाल अशा गाण्याचं चित्रीकरण करण्यात आलंय. गुरु ठाकूर यांनी हे गाणं लिहिल असून सुजित कुमार यांनी कोरीओग्राफी केली आहे. अरुण प्रसाद यांनी सिनेमाच्या छायांकनाची धुरा सांभाळली आहे…या सिनेमाच काही शुटींग बाकी असून  मुंबई, जेजुरी, कोल्हापूर, बदामी, कर्नाटक या ठिकाणी सिनेमाचं शुटींग झालं आहे …सिनेमात एन्टरटेनमेन्ट मसाला असून तो नक्कीच प्रेक्षकांना आवडेल अशी या सिनेमाच्या टीमची आशा आहे.
carryon450

Story img Loader