अलिकडेच प्रदर्शित झालेल्या ‘नाय वरन-भात लोन्चा’ चित्रपटामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढल्या आहेत. त्यांच्या विरोधात मुंबईच्या माहिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता महेश मांजरेकर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अलिकडेच प्रदर्शित झालेला महेश मांजरेकर यांचा हा चित्रपट वेगवेगळ्या कारणांनी वादाच्या भोवऱ्यात सापडला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वृत्तसंस्था एएनआयनं यासंदर्भात ट्वीट केलं आहे. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय, ‘माहिम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठी चित्रपटात अल्पवयीन मुलांची आक्षेपार्ह दृश्य दाखवल्यानं प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या विरोधात कलम २९२, ३४ तसेच पोस्को कलम १४ आणि IT कलम ६७ व ६७ ब अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी न्यायालयानं चौकशीचे आदेश दिले आहेत.’

दरम्यान महेश मांजरेकर यांचं दिग्दर्शन असलेला ‘नाय वरन-भात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ हा चित्रपट अलिकडच्या काळात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील बऱ्याच दृश्यांना विरोध झाला होता. या चित्रपटात काही अल्पवयीन मुलांची दृश्य देखील आहेत ज्यावर आक्षेपही घेण्यात आला होता. त्यावरुनच महेश मांजरेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याचं बोललं जात आहे. मात्र अद्याप महेश मांजरेकर यांनी या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Case filed against marathi actor director mahesh manjrekar know the details mrj