अभिनेत्री सोनाक्षी सिन्हासह पाच जणांवर उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३७ लाखांची मोठी रक्कम घेऊन कार्यक्रमास अनुपस्थित राहिल्याप्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिल्लीत होणाऱ्या एका कार्यक्रमामध्ये सोनाक्षी उपस्थित राहणार होती. ३० सप्टेंबर २०१८ मध्ये हा कार्यक्रम पार पडणार होता. यासाठी सोनाक्षीला ३७ लाखांचं मानधन देण्यात आलं होतं. मात्र ऐनवेळी सोनाक्षीनं येण्याचं टाळलं. त्यानंतर २४ नोव्हेंबरला तिच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. कार्यक्रमाचे आयोजक प्रमोद शर्मा यांनी ही तक्रार दाखल केली आहे.
Moradabad: Case filed against 5 persons for cheating including actor Sonakshi Sinha in Katghar area y'day on a complaint filed on Nov 24, allegedly because the actor didn't perform at a function in Delhi on September 30 after taking payment of 37 lakh.(File pic of Sonakshi Sinha) pic.twitter.com/BmkkszqDeP
— ANI UP (@ANINewsUP) February 23, 2019
‘सोनाक्षीनं ऐनवेळी कार्यक्रमात उपस्थिती लावण्यास नकार दिला तिच्यामुळे मला आम्हाला मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावं लागलं, तिचा प्रवास- राहण्याच्या सोयीसाठी आम्ही ९ लाखांचा अतिरिक्त खर्च केला होता. शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही तिची मनधरणी केली मात्र ती पैसे घेऊनही अनुपस्थित राहिली असा आरोप प्रमोद शर्मा यांचा आहे. यावर सोनाक्षीनं अद्यापही आपली बाजू मांडली नाही. सोनाक्षीसोबतच टॅलेंट फुल ऑफ कंपनीचे अभिषेक सिन्हा, मालविका पंजाबी, धूमिल ठक्कर, अॅडगर सकारिया यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.