बॉलिवूडच्या ‘पीके’ या चित्रपटाविरोधातील वाद अजूनही शमण्याची चिन्हे दिसत नाहीत. या चित्रपटातील मुख्य कलाकार आमिर खान, दिग्दर्शक राजू हिराणी आणि ‘पीके’च्या निर्मात्यांवर राजस्थानमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथील बजाज नगर पोलिस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. भारतीय दंडसंहितेच्या २९५ अ आणि १५३ अ या कलमांनुसार धार्मिक भावना दुखावणे आणि समाजात द्वेषभाव निर्माण करण्याचा ठपका या चित्रपटावर ठेवण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून हिंदुत्ववादी संघटनाच्या विरोधामुळे ‘पीके’ या चित्रपटाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे.

Story img Loader