भारतीय संघाचा युवा फलंदाज विराट कोहलीशी केवळ मैत्रीचे नाते असल्याचे सांगणारी बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यावेळी आपल्या ‘मित्रा’ला भेटण्यासाठी थेट न्यूझीलंडमध्ये दाखल झाली. सध्या न्यझीलंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाचे कसोटी सामने सुरू आहेत.
अनुष्का आणि विराट मधील नात्यासंबंधी चर्चेला उधाण आल्याने यावेळी अनुष्काने न्यूझीलंडमध्ये दाखल झाल्याच्या बाबतीत तितकीच गुप्तता बाळगण्याचा प्रयत्न केला असेलही पण, चाहत्यांना कोण सावरणार? असेच काही झाले आणि न्यूझीलंडमधील या दोघांच्या चाहत्याने अनुष्का-विराटला एकत्र फिरताना बघितले, मग काय ‘क्लिकक्लिकाट’ सुरू झाला आणि हे दोघे कॅमेरात कैद झाले..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा