सेन्सॉर बोर्डाने अक्षेपार्ह आणि शिवराळ अशा २८ शब्दांची नोंद असलेली यादी रोखून धरली आहे. सेन्सॉर बोर्डातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या या यादीला प्रखर विरोध आणि विवादास्पद परिस्थिती निर्माण झाल्याने सेन्सॉर बोर्डाला ही भूमिका घ्यावी लागली. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार ‘सेंन्ट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन’ ‘सीबीएफसी’च्या मुंबईतील दिर्घ बैठकीत बोर्डातील अनेक सदस्यांनी याबाबत विरोध दर्शविल्याने ही यादी थांबविण्यात येऊन, परिस्थिती पुर्ववत ठेवण्यात आली.
यापूर्वीदेखील बोर्डाने शिवराळ शब्दांची यादी प्रसिध्द केली होती, त्याचप्रमाणे चित्रपटकर्त्यांना ‘बंबई’ अथवा ‘बॉम्बे’च्या ठिकाणी मुंबईचा वापर करण्यास सांगितले होते. सेन्सॉर बोर्डाद्वारे उदभवणाऱ्या विवादास्पद परिस्थितीवर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानेदेखील नाराजी दर्शविल्याचे सुत्रांकडून समजते.
आक्षेपार्ह शब्दांची यादी सेन्सॉर बोर्डाने रोखून धरली
सेन्सॉर बोर्डाने अक्षेपार्ह आणि शिवराळ अशा २८ शब्दांची नोंद असलेली आपली यादी रोखून धरली आहे. सेन्सॉर बोर्डातर्फे जारी करण्यात आलेल्या या यादीला प्रखर विरोध...
First published on: 24-02-2015 at 02:06 IST
TOPICSबॉलिवूडBollywoodमनोरंजनEntertainmentमनोरंजनManoranjanहिंदी चित्रपटHindi Filmहिंदी मूव्हीHindi Movieहिंदी सिनेमाHindi Cinema
+ 2 More
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cbfc circular banning cuss words on hold after controversy