बॉलिवूड अभिनेत्री आणि माजी विश्वसुंदरी सुष्मिता सेनने तिच्या मुंबईमधील घरातील फॉल-सिलिंग कोसळल्याचे टि्वट केले आहे. ग्रिलला बसवलेल्या पीना निघाल्याने फॉल-सिलिंगचा एक भाग मंगळवारी (३ जून) सकाळी कोसळला. याविषयीची माहिती टि्वटरवर देताना ती म्हणाली, ग्रिलला बसवलेल्या पीना निघाल्याने फॉल-सिलिंगचा एक भाग पूर्णपणे कोसळला. याआधी मी कधीच असं काही अनुभवल नव्हतं. ते फारच भितीदायक होत. या घटनेत घरातील कोणालाही इजा झाली नसल्याने तिने देवाचे आभार मानले. घरातील मुलं, कर्मचारी आणि आम्ही सर्व सुखरूप असल्याचे सांगत, देवाच्या कृपेमुळे आणि चाहत्यांच्या आशिर्वादामुळेच या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याचे तिने म्हटले आहे. चाहत्यांचे आभार मानत त्यांच्याविषयी प्रेमयुक्त भावना व्यक्त केल्या आहेत. अशा घटनांमुळे लोकांच्या आशीर्वादावरील आपला विश्वास वाढत असल्याचेदेखील तिने म्हटले आहे.