दिवसाची खासियत लक्षात घेऊन आपल्या होमपेजच्या ‘डुडल’मध्ये बदल करणाऱ्या ‘गूगल’च्या गुरुवारच्या ‘डुडल’ने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले. दूरवरून जाणारी आगगाडी, भाताची शेते आणि आगगाडी बघण्यासाठी त्या शेतांमधून पळणारी एक मुलगी आणि मुलगा हे कृष्ण-धवल रंगातील ‘डुडल’ सत्यजित रे यांच्या अजरामर ‘पाथेर पांचाली’ या चित्रपटातील प्रसंगाची आठवण करून देणारे आहे. हे ‘डुडल’ म्हणजे गूगलने सत्यजित रे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना केलेला सलाम आहे.
गूगलच्या या ‘डुडल’मध्ये दिसणारा मुलगा म्हणजे सत्यजित रे यांच्या ‘पाथेर पांचाली’चा नायक अपू आणि मुलगी म्हणजे त्याची बहिण दुर्गा. विभुतीभूषण बंडोपाध्याय या बंगाली लेखकाच्या कादंबरीवर आधारित हा चित्रपट रे यांचा पहिलाच चित्रपट होता. या चित्रपटाने सत्यजित रे यांचे नाव कानाकोपऱ्यात पसरले. या चित्रपटाचा सन्मान कान्स महोत्सवातही केला गेला. या चित्रपटाशिवाय रे यांनी ३६ चित्रपट दिग्दर्शित केले.
चित्रपटांशिवाय सत्यजित रे यांनी विपुल लेखनही केले असून त्यांनी रेखाटलेल्या ‘फेलूदा’ आणि ‘प्रोफेसर संकू’ यांना बंगालच नाही, तर भारतातही प्रसिद्धी मिळाली. सत्यजित रे यांच्या चित्रपट क्षेत्रातील योगदानाबद्दल १९९२ मध्ये ऑस्कर देऊन त्यांना गौरवण्यात आले.
सत्यजित रे यांना गूगलचा सलाम, ९२ व्या जयंतीनिमित्त खास ‘डुडल’
दिवसाची खासियत लक्षात घेऊन आपल्या होमपेजच्या ‘डुडल’मध्ये बदल करणाऱ्या ‘गूगल’च्या गुरुवारच्या ‘डुडल’ने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले. दूरवरून जाणारी आगगाडी, भाताची शेते आणि आगगाडी बघण्यासाठी त्या शेतांमधून पळणारी एक मुलगी आणि मुलगा हे कृष्ण-धवल रंगातील ‘डुडल’ सत्यजित रे यांच्या अजरामर ‘पाथेर पांचाली’ या चित्रपटातील प्रसंगाची आठवण करून देणारे आहे.
First published on: 02-05-2013 at 06:08 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Celebrating satyajit rays 92nd birth anniversary