सिध्दार्थ जाधव
दिवाळीशी माझे नाते अगदी जन्मजात आहे असेच म्हणाला हवे. कारण माझा वाढदिवसच २३ ऑक्टोबरचा, म्हणजेच लक्ष्मीपूजनाच्या दिवसाचा. त्यामुळे मला दिवाळी आणि वाढदिवस असे दोन्ही एकाच दिवशी साजरा करण्याचा योग येतो. दोन्हीसाठीच्या शुभेच्छा मला एकाच दिवशी स्वीकारता येतात. एक प्रकारे माझा एकूणच आनंद द्विगुणित करण्याचा योग आहे म्हणा ना! यावर्षीच्या माझ्या दिवाळीचे विशेष म्हणजे माझी अत्यंत महत्वाची भूमिका असणारा ‘रझाकार’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाच्या पूर्णतेच्या घोषणेचा सोहळा शहापूर येथे अभिनेते धर्मेन्द्र यांच्या उपस्थितीत आणि प्रचंड गर्दित पार पडला हे विशेष. माझ्यासाठी हा विशेष असा रोमांचक अनुभव होता. यावर्षीची दिवाळी याच क्षणापासून सुरू झाली असे म्हटले तरी चालेल.

Story img Loader