दिग्दर्शक करण जोहरचा ‘कॉफी विथ करण’ ‘Koffee With Karan’शो चांगलाच हिट ठरला. आता या शोच्या सहाव्या पर्वालाही सुरूवात झाली आहे. या शोमध्ये यापूर्वी आमिर खान, दीपिका, प्रियांका चोप्रा, सोनम कपूर, रणवीर सिंग, रणवीर कपूर, करिना, कतरिना, आलिया भट्ट, अक्षय कुमार अशा कित्येक कलाकारांनी उपस्थिती लावली. ‘Koffee With Karan’च्या नव्या सिझनमध्येही यातील बरेच कलाकार पुन्हा दिसणार आहे. यापूर्वीच्या सिझनमध्येही हे कलाकार दिसले होते. मात्र बॉलिवूडमधले काही कलाकार असेही आहेत की ज्यांना एकदाही करणनं आपल्या शोमध्ये येण्याचं आमंत्रण दिलं नाही.
वेब सीरिज, चित्रपट अशा वेगवेगळ्या माध्यमात झळकलेल्या या मंडळींची गणना आता आघाडीच्या सेलिब्रिटींच्या यादीत झाली आहे. त्यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे मात्र अद्यापही करणननं त्यांना आपल्या शोमध्ये येण्याचं आमंत्रण दिलेलं नाही, त्यामुळे या कलाकरांना करणच्या शोमध्ये पाहण्याची संधी कधी मिळणारी याचं कुतूहल चाहत्यांना आहे. हे कलाकार कोणते ते पाहू.
राधिका आपटे
वेब सीरिजची नवी क्वीन राधिका आपटे या यादीत अग्रस्थानी आहे. चित्रपटांपेक्षा वेब सीरिजमध्ये तिनं स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. हिंदीतच नाही तर मराठीतही तिनं स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
राजकुमार राव
‘न्यूटन’, ‘स्त्री’, ‘बरेली की बर्फी’ चित्रपटातील दमदार अभिनयानं प्रेक्षकांच्या हृदयावर राजकुमारनं राज्य केलं. कोणत्याही भूमिकेत तो सहज समावून घेतो म्हणूनच बॉलिवूडमध्ये राजकुमार खूपच लोकप्रिय होताना दिसत आहे. राजकुमारनंही कॉफी विथ करणच्या नव्या सिझनमध्ये दिसावं अशी त्याच्या चाहत्याची इच्छा आहे.
स्वरा भास्कर / तापसी पन्नू</strong>
सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असलेल्या स्वरालाही या सिझनमध्ये पाहण्याची इच्छा चाहत्यांनी व्यक्त केली आहे. करणच्या नव्या सिझनमध्ये जोडीनं सेलिब्रटी येणार आहेत तेव्हा तापसी पन्नू, स्वरा भास्कर अशी जोडीदेखील पाहायला मिळावी असंही अनेक चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यामातून सुचवलं आहे.
विकी कौशल/ आयुषमान खुराना
चाहत्यांच्या ‘विश लिस्ट’मध्ये विकी कौशल आणि आयुषमान खुरानाचंही नाव चर्चेत आहेत. या जोडीनंही उपस्थिती लावावी असंही चाहते म्हणाले आहे.