मराठी नववर्षास मोठ्या दिमाखात सुरुवात झाली आहे. मराठी बांधवांनी त्यांच्या घरावर गुढी उभारून उत्साहात आणि आनंदात नव्या वर्षाचे स्वागत केले. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या या सणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. शोभायात्रांमध्ये वाहणारा सळसळता उत्साह आणि तरुणाईचा कल्ला या साऱ्या आनंददायी वातावरणामध्येच कलाकारही मागे नाहीत. गुढी पाडव्याच्या निमित्ताने हेमंत ढोमे, गायश्री जाधव, श्रेयस जाधव यांसारख्या मराठी कलाकारांनी चाहत्यांना शुभेच्छांसह महत्त्वाचा संदेशसुद्धा दिला आहे.

मराठीपणाची ‘गुढी’ उभारु- हेमंत ढोमे

Jui Gadkari
Video : शूटिंगमध्ये फावला वेळ मिळताच जुई गडकरी काय करते? स्वत: व्हिडीओ पोस्ट करत दिली माहिती
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Puneri kaka dance video uncle aunty dance video goes viral on social media
VIDEO: पुणेकर काकांचा नाद नाय! चंद्रा गाण्यावर केला खतरनाक डान्स; नेटकरी म्हणतात “आयुष्य असं जगता आलं पाहिजे”
Marathi Actor Siddharth Chandekar Special Post share for amey wagh on his birthday
“जीभेवर व्हेज, मनात नॉनव्हेज…”, सिद्धार्थ चांदेकरने अमेय वाघला वाढदिवसाच्या दिल्या हटके शुभेच्छा; म्हणाला…
shivani rangole shares beautiful birthday wish post for kavita medhekar
“ताई तुझ्याकडून कायम…”, ऑनस्क्रीन सासूबाईंसाठी शिवानी रांगोळेची खास पोस्ट! कविता मेढेकर कमेंट करत म्हणाल्या…
Kushal Badrike and Viju Mane wished Pravin Tarde on his birthday in a funny prediction
Video: प्रवीण तरडेंसाठी कुशल बद्रिकेने लिहिलेल्या कविता ऐकून विजू माने वैतागले, म्हणाले…
Gaitonde
कलाकारण: बाजारप्रणीत इतिहासाच्या पलीकडले गायतोंडे
kiara advani and mithun chakravarti
मिथून चक्रवर्ती ते कियारा अडवाणी, बॉलीवूडमधील ‘या’ लोकप्रिय कलाकरांची खरी नावे माहित आहेत का?


दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा कुटुंबीयांसोबतच अगदी मराठमोळ्या पारंपरिक पद्धतीनं गुढी उभारणार आहे. आपल्यातली विषमता बाजूला सारुन, सगळ्यांनी एकत्र येऊन मराठी भाषेची आणि मराठीपणाची गुढी उभारुया. या नवीन वर्षात माझे एक नाटक येत आहे, सध्यातरी या नाटकाचे नाव गुलदस्त्यात असून, या नाटकाचा पहिला प्रयोग दुबईला होणार आहे.

शेतकऱ्यासाठी नवीन वर्षाची हीच खरी सुरुवात- भाऊसाहेब शिंदे


ग्रामीण भागात ‘गुढीपाडवा’ या सणाचा उत्साह तसा मोठाच! कारण या सणापासूनच आपला शेतकरी वर्ग नवीन कामाला सुरुवात करतो. मी स्वतः शेतकरी कुटुंबातला असल्याने शेतकऱ्याच्या घामाचे महत्त्व मला चांगलेच ठाऊक आहे. आमच्या गावी सुर्योदयापूर्वीच घराच्या मोठ्या प्रांगणात लांबसडक काठी आणून त्यावर गुढी उभारली जाते. त्यादिवशी आम्ही सर्व गावकरी मंडळी एकत्र येऊन ग्रामपंचायतीचा लेखाजोखा, राहिलेले प्रश्न आणि हिशोबाची आखणीदेखील करतो. मराठी नववर्षाची हीच खरी सुरुवात असल्याने नवीन संकल्पनादेखील यावेळी राबवल्या जातात. कामानिमित्त गावाकडची बरीचशी माणसे शहरात गेली आहेत, त्या सर्वांना मी सांगू इच्छितो की गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपल्या गावी पुन्हा या. आपल्या जवळच्या माणसांसोबत हा सण साजरा करा. पैशांपेक्षा नाती लाखमोलाची असतात. साध्या आणि सोप्या पद्धतीत आपल्या घरच्यांसोबत ‘गुढी’ उभारण्याचा आनंद हा काही न्याराच असतो.

वाचा : ‘फुलपाखरू’मध्ये गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मानस आणि वैदेहीची एक नवीन सुरुवात

यावर्षीचा गुढीपाडवा खूप खास- गायत्री जाधव


दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा अगदी सहज सोप्या पद्धतीने गुढीपाडवा साजरा करणार आहे. पण यावर्षीचा गुढीपाडवा माझ्यासाठी खास आहे कारण या नवीन वर्षासोबत माझीसुद्धा नवीन वाटचाल सुरु झाली आहे. लवकरच ‘बबन’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, या चित्रपटाद्वारे मी चित्रपटसृष्टीत माझे पहिले पाऊल टाकत आहे.

नवनवीन प्रयोगाची ‘गुढी’ उभारणार- श्रेयस जाधव, निर्माता-दिग्दर्शक


मराठी नववर्षाचा प्रारंभ म्हणजे ‘गुढी पाडवा’. आपल्या मराठी लोकांसाठी हा दिवस खूप मोठा असून, इंग्रजी केलेंडरनुसार आपण १ जानेवारीला जसे महत्व देतो, तेवढेच महत्व किमान मराठी तरुणांनी तरी ‘गुढीपाडवा’ला द्यायला हवे. आमच्या पुण्यात या दिवसात मोठा उत्साह पाहायला मिळतो. अनेक साग्रसंगीत कार्यक्रम घडतात. ढोलताशा पथक, लेझिम पथक रस्त्यांवर उतरतात. विविध वादकांच्या जयघोषात आम्ही पुणेकर नववर्षाचे उत्साहात स्वागत करतो. यावर्षीदेखील असेच असणार आहे. शिवाय यावर्षी आमच्या गणराज असोशिएटस निर्मितीसंस्थेअंतर्गत नवनवीन प्रयोगाची ‘गुढी’ मी उभारणार आहे. ज्यात ‘मी पण सचिन’ या सिनेमाच्या चित्रीकरणाची जोरात तयारी सुरु आहे, काही रेप सॉंगदेखील देण्याच्या विचारात मी आहे.