सामाजिक कार्य करते मी आता…
हो… पूर्ण वेळ…
थेटच सांगते. घाबरायचं काय त्यात…
लपवालपवी कशाला…
एकटी असते आता मी.
लग्न मोडलं माझं…
घटस्फोट झाला…
मला सेन्स ऑफ बिलाँगिंग येत नाही म्हणायचा.
मला कळलंच नाही त्याला काय म्हणायचं होतं ते.
समजून घेण्याचा केला मी प्रयत्न पण..
त्या इंग्लिश शब्दांची फोड ना त्यानं मला सांगितली ना मला कधी करता आली.
हे बरंय नाही…
स्पष्ट काही सांगायचं नसलं की माणूस खांदे उडवत इंग्रजी शब्द वापरतो.
त्याला सिच्युएशनला डिग्निटीनं हँडल केल्याचं समाधान मिळतं.
थोडं ‘एलीट’ वाटतं.
तुम्ही टीव्हीवर दिसता ना… व्हिलन…
तुम्ही खरंतर हिंदीत जायला पाहिजे.
तिकडेपण तुम्हाला घाबरतील

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसात होता.
चांगला शिकलेला होता, पण
बिनसलंय…
त्याच्या भाषेत ‘वर्कआऊट’ होईना!
रिलेशनशिप पेनफुल होऊ लागलं वगैरे…
तरीही मी निघेना, मग मारहाण करू लागला.
प्यायल्यामुळे कारणाचीही गरज पडेना.
मी आईला सांगितलं.
नवरा आहे गं, मारली एखादी थोबाडीत तर काय फरक पडतो…
पण याचं काही कमी होईना.
मग एकदा आईनंच पाहिलं.
आईनं वडिलांना सांगितलं.
वडिलांनी आईचा कानच फोडला…
तुला काय करायचंय? ते नवरा-बायको बघून घेतील काय करायचं ते…
पण आईनं साथ दिली, धीरही दिला… तेव्हा सुटलं…
घेतली सुटका करून.
तुम्ही माझ्या नवऱ्याला भेटला असतात नं…
तुम्हाला व्हिलनचे रोल करायला मदत
झाली असती…
डेंजर होता तो…
सॉरी हं गंमत केली…
फार दिवसांनी हसले हो. मनमोकळं…
मागे भेटला होता एकदा…
परत सुरू करू, चूक झाली वगैरे…
त्याला त्याचं काय आणि कुठलं चुकलंय काय माहीत…
अजूनही छान दिसतेस म्हणाला.
थोडं बरं वाटलं मनाला.
नाही म्हणाले…
गेला.
पीएच.डी. करतेय आता.
सोशिओलॉजीमध्ये…
डॉक्टरेट मिळवायचीयच.
कुणासाठी थांबायचं नाही आता.
सगळं मागे ढकलून पुढे जायचा प्रयत्न करतेय.
स्वच्छ वाटतं…
आपलं वाटतं सगळं, स्वत:चं.
याच्या त्याच्या गुडघ्याला लटकत खुरडत जगण्यापेक्षा बरं.
दोन-चार दिवस नावं ठेवतात.
मग स्वत:च नाव काढतात.
धीराची गंऽऽ म्हणतात.
आता रमलेय मी माझ्या कामात पीएच.डी.त.
बघा पाऊसही आला…
सगळं धुऊन जायला हवं.
त्या आठवणीसकट, त्या नावासकट, उग्र वासासकट.
मला माझा श्वास हवाय.
माझी ‘मी’ हवीय…
स्वत:ची.
असाच पडत राहावा संततधार.
रंध्रारंध्रातून तो निघून जाईपर्यंत…
तुमच्या सीरियल-सिनेमात मारतात ते
खोटं खोटं असतं ना हो..?
तरीच.
नाहीतर कोण सहन करेल हो एवढं…

ता.क.
पाऊस थांबला होता.
झाड स्वच्छ उभं होतं.
– मिलिंद शिंदे

पोलिसात होता.
चांगला शिकलेला होता, पण
बिनसलंय…
त्याच्या भाषेत ‘वर्कआऊट’ होईना!
रिलेशनशिप पेनफुल होऊ लागलं वगैरे…
तरीही मी निघेना, मग मारहाण करू लागला.
प्यायल्यामुळे कारणाचीही गरज पडेना.
मी आईला सांगितलं.
नवरा आहे गं, मारली एखादी थोबाडीत तर काय फरक पडतो…
पण याचं काही कमी होईना.
मग एकदा आईनंच पाहिलं.
आईनं वडिलांना सांगितलं.
वडिलांनी आईचा कानच फोडला…
तुला काय करायचंय? ते नवरा-बायको बघून घेतील काय करायचं ते…
पण आईनं साथ दिली, धीरही दिला… तेव्हा सुटलं…
घेतली सुटका करून.
तुम्ही माझ्या नवऱ्याला भेटला असतात नं…
तुम्हाला व्हिलनचे रोल करायला मदत
झाली असती…
डेंजर होता तो…
सॉरी हं गंमत केली…
फार दिवसांनी हसले हो. मनमोकळं…
मागे भेटला होता एकदा…
परत सुरू करू, चूक झाली वगैरे…
त्याला त्याचं काय आणि कुठलं चुकलंय काय माहीत…
अजूनही छान दिसतेस म्हणाला.
थोडं बरं वाटलं मनाला.
नाही म्हणाले…
गेला.
पीएच.डी. करतेय आता.
सोशिओलॉजीमध्ये…
डॉक्टरेट मिळवायचीयच.
कुणासाठी थांबायचं नाही आता.
सगळं मागे ढकलून पुढे जायचा प्रयत्न करतेय.
स्वच्छ वाटतं…
आपलं वाटतं सगळं, स्वत:चं.
याच्या त्याच्या गुडघ्याला लटकत खुरडत जगण्यापेक्षा बरं.
दोन-चार दिवस नावं ठेवतात.
मग स्वत:च नाव काढतात.
धीराची गंऽऽ म्हणतात.
आता रमलेय मी माझ्या कामात पीएच.डी.त.
बघा पाऊसही आला…
सगळं धुऊन जायला हवं.
त्या आठवणीसकट, त्या नावासकट, उग्र वासासकट.
मला माझा श्वास हवाय.
माझी ‘मी’ हवीय…
स्वत:ची.
असाच पडत राहावा संततधार.
रंध्रारंध्रातून तो निघून जाईपर्यंत…
तुमच्या सीरियल-सिनेमात मारतात ते
खोटं खोटं असतं ना हो..?
तरीच.
नाहीतर कोण सहन करेल हो एवढं…

ता.क.
पाऊस थांबला होता.
झाड स्वच्छ उभं होतं.
– मिलिंद शिंदे