प्रसिद्ध सेलिब्रिटी जोडप्याने गुडन्यूज दिली आहे. लग्नानंतर पाच महिन्यांनी या दोघांनी ते आई-बाबा होणार असल्याचं सोशल मीडियावर जाहीर केलं आहे. त्यांनी तीन फोटो शेअर करून चाहत्यांची ही आनंदाची बातमी शेअर केली. या जोडप्याचं नवीन प्रवासासाठी चाहते अभिनंदन करत आहेत.
प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता किरण अब्बावरम आणि अभिनेत्री रहस्या गोरक हे लवकरच आई-बाबा होणार आहेत. दोघेही लवकरच आपल्या पहिल्या बाळाचं स्वागत करणार आहेत. या जोडप्याने मंगळवारी इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करून ही बातमी शेअर केली आहे. फोटोमध्ये रहस्या बेबी बंप फ्लाँट करताना दिसत आहे.
किरण अब्बावरम आणि अभिनेत्री रहस्या गोरक या दोघांनी २०१९ मध्ये ‘राजा वारू राणी गारू’ या तेलुगू चित्रपटामधून पदार्पण केलं होतं. तेव्हापासून ते एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर त्यांनी १३ मार्च रोजी एका खासगी सोहळ्यात साखरपुडा केला होता. हैदराबादच्या एका रिसॉर्टमध्ये या जोडप्याचा साखरपुडा झाला होता. मग त्यांनी लग्न केलं, आता या दोघांनी फोटो शेअर करत आनंदाची बातमी दिली.
पाहा पोस्ट –
अभिनेता किरण अब्बावरम आणि अभिनेत्री रहस्या गोरक यांनी २२ ऑगस्ट २०२४ रोजी कूर्गमध्ये एका खासगी सोहळ्यात लग्नगाठ बांधली. जवळपास चार वर्षांपासून ते डेट करत होते. चार वर्षे आपलं नातं गुपित ठेवल्यानंतर या जोडप्याने मार्च २०२४ मध्ये हैदराबादमध्ये साखरपुडा केला. त्यानंतर पाच महिन्यांनी ऑगस्टमध्ये लग्न केलं, व लग्नानंतर पाच महिन्यांनी त्यांनी आनंदाची बातमी दिली आहे.
किरणने ‘एसई कल्याणमंडपम’, ‘सम्माथमे’, ‘रुल्स रंजन’ यासारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.