युवा पिढीच्या गोष्टी, मित्र–मैत्रिणींशी, कुटुंबियांशी असलेले त्यांचे नातेसंबंध आधुनिक पद्धतीने दाखविण्याचा प्रयत्न झी युवा वाहिनीवर केला जातोय. या वाहिनीवरील तरुणाईला अगदी साजेशी अशी मालिका म्हणजे ‘लव्ह लग्न लोचा’. या मालिकेतून रुचिता जाधव हा नवीन चेहरा आपल्या भेटीला आला. ग्लॅमरस तसेच स्वतःच्या अटींवर आपलं आयुष्य जगणाऱ्या ‘काव्या’ची भूमिका रुचिता जाधव या मालिकेमध्ये साकारते आहे. तिच्या सौंदर्यावर आजच्या घडीला अनेक मुलं फिदा आहेत. सध्या अगदी सुडौल बांधा असणाऱ्या रुचिताचे कधी एकेकाळी ९० किलो इतके वजन होते. त्यामुळेच कोणताही मुलगा आपल्या प्रेमात पडूच शकत नाही, अशी भावना असणाऱ्या रुचिताच्या क्रशस्टोरी बद्दल आपण जाणून घेणार आहोत.

माझ्या आयुष्यात आजवर खूप क्रश झालेत पण माझ्यावर कुणाचं क्रश झालं असेल असं मला वाटत नाही. याचं कारण एकेकाळी माझं वजन ९० किलो होतं आणि मला चष्मासुद्धा होता. सात वर्षांपूर्वी मी इतकी जाड होते की शॉपर्स स्टॉपमधले अतिजाड लोकांसाठीचे कपडेसुद्धा मला व्हायचे नाहीत. फर्ग्युसन कॉलेजमध्ये असताना मला अनेकदा क्रश झालं. माझ्या ग्रुपमधल्या प्रत्येक मुलीचा बॉयफ्रेंड होता. पण, ग्रुपमध्ये मी एकमेव अशी मुलगी होते जिचा कॉलेज लाइफमध्ये बॉयफ्रेंड नव्हता. केवळ मी जाड असल्यामुळे माझ्या आयुष्यात कोणीच मुलगा आला नाही. फर्ग्युसन कॉलेजच्या कट्ट्यावर बसून मी टवाळक्या बऱ्याच केल्या. त्यावेळी कॉलेजमध्ये एक मुलगा करिझ्मा गाडी घेऊन यायचा. त्याच्यावर माझं क्रश होतं. बारावीच्या परीक्षेवेळी तो माझ्या मागे बसला होता. जर्मनचा पेपर चालू असताना त्याने मला रुचिता रुचिता….. म्हणून हाक मारली. मी जाड असल्याने ज्याने माझ्याकडे अकरावी, बारावीला साध वळूनही बघितलं नाही. त्याला माझं नाव माहितीये हे कळल्यावर मला धक्काच बसला. त्याला एका प्रश्नासाठी माझी मदत हवी होती. पण माझं नाव त्याला माहितीये या विचारात मी इतकी गुंतले की त्याला मदत करणं राहूनच गेलं. माझ्यासाठी हा क्षण खूप महत्त्वाचा ठरला. कारण ९० किलो वजन असलेली एक मुलगी जी फक्त चार मैत्रिणींसोबत फिरायची तिला एका हॅण्डसम मुलाने हाक मारली होती. हीच बाब माझ्यासाठी खूप होती. यामुळे प्रेरित होऊन मी नंतर वजन कमी करण्याचा निर्णय घेतला.

zee marathi new serial promo tula japanar ahe
६ किलो वजन बांधून, १४ फूट पाण्यात उडी मारली अन्…; ‘झी मराठी’च्या नव्या मालिकेचा थरारक प्रोमो पाहिलात का? अभिनेत्री म्हणाली…
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Flight Rule Of Handbags Indigo Scales Questioned By Passenger After Same Bag Weighs 2 Kg Differently video
“पैसे उकळण्यासाठी काहीही” विमानतळावर होतेय प्रवाशांच्या बॅगांची फसवणूक? VIDEO पाहून आत्ताच सावध व्हा
Actor Vicky kaushal 25 kilos weight gain for Chhaava 80 to 105 kilos expert advice on weight gain
बॉलीवूड अभिनेता विकी कौशलने ‘छावा’ चित्रपटासाठी वाढवलं २५ किलो वजन, तुम्हालाही वजन वाढवायचं असेल तर तज्ज्ञांचा ‘हा’ सल्ला ठेवा लक्षात
Ram Kapoor followed this eating pattern to lose 55 kg
Weight Loss: ५५ किलो वजन कमी करायला अभिनेत्याने वापरला ‘हा’ फंडा; फक्त टाळा ‘या’ चुका; वाचा डॉक्टर काय सांगतात
Bollywood actress Bandish Bandits star Shreya Chaudhary on gaining weight due to slip disc expert shared advice
अचानक वजन वाढल्यामुळे बॉलीवूड अभिनेत्रीला झाला ‘स्लिप डिस्क’चा त्रास; तज्ज्ञांनी सांगितला वजन कमी करण्याचा उपाय
Kishori Godbole
यशाच्या शिखरावर असताना काम करणं बंद केलं कारण….; अभिनेत्री किशोरी गोडबोले काय म्हणाली?
krushna abhishek bought 3 bhk flat to put new clothes there
प्रसिद्ध कॉमेडियनने कपडे आणि बूट ठेवायला खरेदी केला ३ बीएचके फ्लॅट; दर सहा महिन्यांनी बदलतो कपड्यांचे कलेक्शन, म्हणाला…

प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीनाकाही कमतरता असते. कोणी दिसायला सुंदर नसतं तर कोणी शरीरानं बेढब असतं. बाह्य सौंदर्यापेक्षा अंतर्गत सौंदर्य नेहमीच महत्त्वाचं असतं. हे जर प्रत्येकाला कळलं तर जगणं नक्कीच सुखकर आणि सुंदर होईल.

चैताली गुरव- chaitali.gurav@indianexpress.com

 

Story img Loader