दर्जेदार चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी सिनेमातील गाण्यांचा देखील महत्वाचे योगदान असते. खास करून रोमँटिक जॉनरच्या गाण्यांवर घेतलेली विशेष मेहनत सिनेमाला यश मिळवून देते. केवळ हिंदीतच नव्हे तर मराठी सिनेमातही हा ट्रेंड पाहायला मिळत असून, संजय लीला भन्साळी निर्मित आगामी ‘लाल इश्क़’ या सिनेमात असचं रोमँटिक जाॅनरचं गाणं रसिकांना पाहायला मिळणार आहे. अभिनेता स्वप्नील जोशी आणि अंजना सुखानी वर चित्रित केलेलं या सिनेमातलं ‘चांद मातला’ हे गाणं नुकतंच सोशल मिडियावर रिलीज करण्यात आलंय. भन्साळी शैलीला साजेसे असणा-या या गाण्याला निलेश मोहरीर यांचं संगीत लाभलं आहे.  अश्विनी शेंडे लिखित ‘चांद मातला’ हे गाणे स्वप्नील बांदोडकर आणि वैशाली सामंत या जोडगोळीच्या आवाजाने अधिक सुरेल झाले आहे. शिवाय सुजित कुमार यानी हे गाणे कोरियोग्राफ केले आहे.
स्वप्ना वाघमारे जोशी यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून शिरीष लाटकर यांनी पटकथा आणि संवाद लिहिले आहेत.  या सिनेमात मिलिंद गवळी, प्रिया बेर्डे, स्नेहा चव्हाण, पियुष रानडे, समिधा गुरु, कमलेश सावंत, जयवंत वाडकर, यशश्री मसुरकर  या कलाकारांच्याही  भूमिका आपल्याला पाहता येणार आहे. येत्या २७ मे ‘लाल इश्क़’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chaand matala song from laal ishq marathi movie