सध्या बॉलिवूडमध्ये गुप्तहेरांवर आधारित चित्रपटांचे पेव फुटलेले पहायला मिळत आहे. रणबीर कपूरचा ‘जग्गा जासूस’ आणि विद्या बालनचा ‘बॉबी जासूस’ या चित्रपटांबद्दल बॉलिवूडमध्ये सध्या बरीच चर्चा रंगली आहे. विद्याचा ‘बॉबी जासूस’ हा चित्रपट ४ जुलैला प्रदर्शित होणार असून, त्याच्या प्रसिद्धीमध्ये ती सध्या व्यस्त आहे. यासाठी ती आता वडोद-याला जाणार आहे.
वडोद-यात ‘श्री’ नावाची एक चहाची टपरी आहे. या टपरीवर निवडणुकीच्या काळात मोदींच्या नावाने मोफतमध्ये चहाचे वाटप केले जात होते. त्यावेळी ही चहाची टपरी खूप चर्चेत आली होती. इतकेच नाही तर त्याच्या मालकाला मोदींच्या शपथविधी समारंभातही आमंत्रित करण्यात आले होते. आता याच चहाच्या टपरीवर जाऊन विद्या चहा पिणार आहे. बॉबी जासूसमध्ये हेराची भूमिका साकारलेल्या विद्याने आपल्याला जर संधी मिळाली तर नरेंद्र मोदींची जासूसी करण्याची इच्छा आहे, असे म्हटले होते. खरंतर तिला भारताचे नवनियुक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिनचर्येबाबत माहिती जाणून घ्यावयाची आहे. गुजरात येथील चहा पिण्याची संधी विद्याला दवडायची नसून, तिच्या मते तेथील चहामध्ये काही तरी खास गोष्ट आहे. “जेव्हा माझ्या टीमने सांगितले की आपण वडोद-याला जाणारा आहोत. त्यावेळेस मी लगेचच श्री चहाच्या टपरीवर जाण्याची इच्छा व्यक्त केली. हे ठिकाण वडोद-यातील सर्वाधिक लोकप्रिय ठिकाणांपैकी एक आहे,” असे विद्या म्हणाली.
‘बॉबी जासूस’ या आगामी चित्रपटात विद्या बालन वेगवेगळ्या २-४ नव्हे तर तब्बल १०० हून अधिक रूपांमध्ये दिसणार आहे.

Story img Loader