चक दे इंडिया’ चित्रपटात उन्मत्त बिंदीयाच्या भूमिकेत नावारुपास आलेल्या शिल्पा शुक्लाला संजय लीला भन्सालीच्या आगामी चित्रपटात ‘मेरी कोम’ची भूमिका करण्याची इच्छा होती. पण, ही भूमिका प्रियांका चोप्रा करणार आहे.
मी मेरी कोमसारखी दिसत असल्याचे माझ्या अनेक मित्रमैत्रिणिंनी मला सांगितले. तसेच, आपल्याला या भूमिकेसाठी ऑडिशन देण्याची इच्छा असल्याचा मॅसेज शिल्पाने संजय लिला भन्सालीला केला होता. मात्र, त्या मॅसेजचे उत्तर केवळ एका स्माइलीमध्ये आल्याचे शिल्पाने सांगितले. हा एक मोठा चित्रपट असून यासाठी नावाजलेल्या अभिनेत्रीसच घेतले जाईल अशी खात्री असल्याचेही ती म्हणाली. लंडन ऑलिम्पिकमधील स्त्रियांच्या मुष्टीयुद्ध स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्यानंतर मेरी कोम नावारुपास आलेली खेळाडू आहे. ईशान्य भारतातील मनिपूर येथील एका आदिवासी समाजाशी मेरी संबंधित आहे.

Story img Loader