झी वाहिनीवरील अतिशय लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे ‘चला हवा येऊ द्या’. या कार्यक्रमाने महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या मनावर राज्य केले आहे. आता या कार्यक्रमातील कलाकार मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे.

चला हवा येऊ द्यामध्ये आपल्या अभिनयाने लाखो लोकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री स्नेहल शिदम लवकरच चित्रपटात झळकणार आहे. तिच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘स्वीटी सातारकर’ आहे. नुकताच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे.

 

View this post on Instagram

 

*नमस्कार. तुम्हाला कळवण्यास आनंद होतोय की, माझा पहिला चित्रपट *”स्वीटी सातारकर”* *येत्या २८ फेब्रूवारी २०२० रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.तुम्ही आता पर्यंत दाखवलेल्या प्रेमासाठी खुप धन्यवाद. हेच प्रेम माझ्या पहिल्या चित्रपटावर सुद्धा दाखवा आणि येत्या २८ फेब्रूवारी ला *”स्वीटी सातारकर”* *आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा.* स्वीटीची जादू ३ मिलियन हुन जास्त लोकांवर झालीय, पण ही जादू शेखर वर चालणार का? २८ फेब्रुवारीपासून येतेय स्वीटी आणि शेखरची स्वीट अँड सॉल्टी कहाणी. #SweetySatarkar #28Feb2020 @sweetysatarkarfilm Director: @the.shabbir.naik Writer: #SumitGiri Producer: #MunafNaik | @santoshmulekarmusic An AVK Distribution Release @khwabeeda_amruta | @sangramsamel | #vijaynikam123 | @vinamrabhabal | @vandana.sardesaiw | #GauriJadhav | @pushkarlonarkar | @snehalshidam | #YogeshDixit | #KomalYadav | @sudhakar_omale | #FaisalKhan | #SunilSingh | #mangeshkangane | #SushantSawant | #SureshSharma | #VaibhavAndherkar | #PrashantVichare | @aakashpendharkar | @sachin_narkar_swaroop | #RiyaTendulkar | @vikasPawar0310 |#HummingBees | @mandar.pimple | @darshanmediaplanet | @avkentertainment19 | @rajshrimarathi | @vizualjunkies

A post shared by Snehal Shidam (@snehalshidam) on

स्नेहल ही ‘चला हवा येऊ द्या ‘च्या ‘होऊ द्या व्हायरल’ या पर्वाची विजेती होती. ती किर्ती कॉलेजमध्ये तिचे शिक्षण घेत आहे. अभ्यासासोबतच ती अनेक एकांकिकांमध्ये देखील दिसते. या एकांकिकांसाठी तिला अनेक पारितोषिके देखील मिळाली आहेत. ‘ओवी’ या व्यावसायिक नाटकामधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

‘स्वीटी सातारकर’ या चित्रपटाचे दिग्दर्शन शब्बीर नाईक यांनी केले आहे. तसेच या चित्रपटाची निर्माती मुनाफ नाईक आणि संतोष साबळेने केली आहे. या चित्रपटात अमृता देशमुख, संग्राम समेळ, विजय निकम, गौरी जाधव, वंदना वाकनीस, पुष्कर पुष्कर लोणारकर, विनम्र भाबल, प्रशांत विचारे हे कलाकार दिसणार आहेत. येत्या २८ फेब्रुवारीला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Story img Loader