झी मराठीवर ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमावर तमाम प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. सुरुवातीपासूनच या कार्यक्रमाला आणि त्यातील विनोदवीरांना महाराष्ट्राच नव्हे तर संपूर्ण जगाने डोक्यावर उचलून धरलं. वेगवेगळ्या सामाजिक स्तरातील लोकं हा कार्यक्रम तितक्याच आवडीने पाहतात. या कार्यक्रमातील विनोदवीरांचे असंख्य चाहते आहेत. डॉ.निलेश साबळे, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, श्रेया बुगडे, सागर कारंडे आणि भाऊ कदम या विनोदवीरांचे तर सर्वत्र कौतुक होत असते. मात्र आता विनोदवीर भारत गणेशपुरे आणि सागर कारंडे हे या कार्यक्रमातून ब्रेक घेण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे प्रेक्षकांना धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भारत गणेशपुरे आणि सागर कारंडे हे दोघेही हिंदी कॉमेडी शो मध्ये सहभागी होत आहेत. त्यामुळे ते दोघेही चला हवा येऊ द्या कार्यक्रमात झळकणार नाही, असं बोललं जात आहे. हिंदी सोनी वाहिनीवर लवकरच एक नवा कॉमेडी शो सुरु होत आहे. या कार्यक्रमात ते दोघेही सहभागी होणार आहेत. शनिवार-रविवारी दोन दिवस हा कार्यक्रम प्रसारित केला जाणार आहे.
जिनिलियाने शेअर केला विलासराव देशमुखांसोबतचा आवडता फोटो, कॅप्शन चर्चेत
सोनी टीव्ही ही आपल्या नव्या कॉमेडी शोबाबत फार जास्त उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे. खूप दिवसांनी लोकांचे ताणतणाव दूर करण्याची संधी मिळत असल्याचे मत वाहिनीने मांडले आहे. या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून अर्चना पुरण सिंग आणि शेखर सुमन सहभागी होणार आहे. येत्या शनिवारच्या भागात या कार्यक्रमात शिल्पा शेट्टीच्या ‘निकम्मा’ चित्रपटाची टीम उपस्थित राहणार आहे. याच नव्या कॉमेडी शो च्या मंचावर भारत गणेशपुरे आणि सागर कारंडे विनोद करताना दिसणार आहेत. पण यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये नाराजीचे वातावरण पाहायला मिळत आहे.
“माझं ब्रेकअप झालं होतं अन् त्यावेळी…”, प्राजक्ता माळीचा वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठा खुलासा
भारत गणेशपुरे आणि सागर कारंडे हे दोघेही हिंदी कॉमेडी शो मध्ये सहभागी होत असल्याचे समजताच ते ‘चला हवा येऊ द्या’ सोडणार का? अशी चर्चा सुरु आहे. अनेकांनी यावर नाराजीही व्यक्त केली आहे. पण नुकतंच यामागचे सत्य समोर आलं आहे. भारत गणेशपुरे आणि सागर कारंडे हे करत असलेल्या हिंदी कॉमेडी शोच्या शूटींगचे दिवस हे वेगळे आहेत. त्यामुळे त्यांना चला हवा येऊ द्या आणि हिंदीतील कॉमेडी शो या दोघांचे शूटींग करता येणार आहे. यामुळे ते दोघेही आपल्याला दोन्हीही कार्यक्रमात विनोदाचा पाऊस पाडताना दिसणार आहेत.