‘चला हवा येऊ द्या’ या मालिकेतून घराघरामध्ये पोहोचलेली अभिनेत्री म्हणून श्रेया बुगडेला ओळखलं जाते. गेली अनेक वर्षे श्रेयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. श्रेया सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते. अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. नुकतंच श्रेयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावरील गणपतीचं दर्शन घेतलं. या निमित्ताने तिने एक पोस्ट शेअर केली आहे.
श्रेया बुगडेने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावरील गणरायाच्या दर्शनाचे काही फोटो शेअर केले आहेत. यात तिच्यासोबत अभिनेते भाऊ कदम आणि कुशल बद्रिके हे दोघेही उपस्थित होते. या फोटोला तिने एक खास कॅप्शनही दिले आहे.
काल माननीय मुख्यमंत्री – महाराष्ट्र राज्य – एकनाथ शिंदे साहेब यांच्या अधिकृत निवासस्थानी गणरायाचे दर्शन घेतले. आम्हाला इतक्या आदराने आणि प्रेमाने आमंत्रण देऊन उत्तम पाहुणचार केल्याबद्दल मुख्यमंत्री आणि संपूर्ण शिंदे कुटूंबियांचे मनापासून आभार. एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे…. Ps : आणि खूप दिवसांनी जग्गू दादाची भेट झाली त्याचा वेगळा आनंद, असे श्रेया बुगडेने म्हटलं आहे.
तिने शेअर केलेल्या या फोटोत तिच्यासह अभिनेते जकी श्रॉफ ही दिसत आहे. दरम्यान श्रेया बुगडेने शेअर केलेली ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. त्याच्या या पोस्टखाली अनेक चाहते कमेंट करताना दिसत आहे. अनेकांनी त्याची ही पोस्ट पाहून विविध कमेंट केल्या आहेत. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया, अशी कमेंट केली आहे.