मराठी कलाविश्वात अनेक नावाजलेले विनोदवीर आहेत. त्यामधील एक अतिशय लोकप्रिय नाव म्हणजे अभिनेता, विनोदवीर भाऊ कदम. आपल्या विनोदबुद्धीने आणि विनोदाचं अचूक टायमिंग साधत भाऊ कदमने अनेकांच्या मनात घर केले आहे. आज महाराष्ट्राच्या घराघरात भाऊ कदम हे नाव पोहोचले आहे. त्यांचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. भाऊ कदम यांचा काल ३ मार्च रोजी वाढदिवस होता. या वाढदिवसानिमित्त अभिनेत्री श्रेया बुगडेने त्यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘चला हवा येऊ द्या’ या मालिकेतून घराघरामध्ये पोहोचलेली अभिनेत्री म्हणून श्रेया बुगडेला ओळखलं जाते. ती सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते. नुकतंच तिने भाऊ कदम यांच्या वाढदिवसानिमित्त एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती आणि भाऊ कदम गाणी गाताना दिसत आहे. त्यासोबत तिने काही फोटोही यात एकत्र केले आहेत.

श्रेया बुगडेने या पोस्टला हटके कॅप्शन दिले आहे. यात ती म्हणाली, “भाऊ अगदी खरं सांगू तर तुम्ही एक खूप मोठे तत्वज्ञानी आहात. तुम्ही तुमच्या सहज वागण्यातून खूप गोष्टी शिकवता, जसं की कितीही टेन्शन असलं तरी माणसाकडे एक डुलकी काढण्या इतका वेळ असतोच. आपण वयाने कितीही मोठे झालो तरी आपल्यातील लहान मूल मोठं होऊ द्यायचं नाही आणि आयुष्य म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद वेचणे.”

“मला साधेपणा हा सर्वात मोठा गुण शिकवल्याबद्दल धन्यवाद भाऊ. मी धन्य आहे की मला तुमच्यासारखा मित्र मिळाला. खूप प्रेम आणि वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. महाराष्ट्रातील सुपरस्टार…. भाऊ कदम”, असे श्रेया बुगडेने म्हटले आहे.

“माझ्या आयुष्यातील प्रेयसीची जागा…”, कुशल बद्रिकेच्या ‘त्या’ पोस्टची सर्वत्र चर्चा

दरम्यान श्रेया बुगडेने शेअर केलेली ही पोस्ट सध्या तुफान व्हायरल होत आहे. तिची ही पोस्ट प्रचंड चर्चेत आहे. तिच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत भाऊ कदमला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chala hawa yeu dya actress shreya bugde share special note for bhau kadam for birthday nrp