बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. सध्या अक्षय कुमार हा त्याच्या आगामी ‘बच्चन पांडे’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. आज १८ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. काही दिवसांपूर्वी अक्षय कुमारने या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी झी मराठीवरील लोकप्रिय कॉमेडी शो ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावर हजेरी लावली होती. यावेळी त्याच्या एका बालपणीच्या मित्राने अक्षयच्या शालेय दिवसातील गोड आठवणी शेअर केल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘बच्चन पांडे’ या चित्रपटानिमित्ताने अक्षय कुमार आणि क्रिती सेनॉन यांनी चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी अक्षय कुमारचा जुना शेजारी आणि बालपणीचे मित्र रवी हा देखील या शोमध्ये सहभागी झाला होता. यावेळी निलेश साबळेने रवीला अक्षयच्या शिक्षणाबद्दलचा प्रश्न विचारला.

अक्षय कुमार शालेय शिक्षणात कसा होता? असा प्रश्न निलेशने विचारला असता रवी म्हणाला, माझी आई अक्षयच्या शाळेत मराठी शिकवण्यासाठी जायची. ती त्या शाळेची शिक्षिका होती. त्यासोबत ती घरात मराठीचीही शिकवणीही घ्यायची. त्यावेळी मी आणि अक्षय एकत्र बसून मराठी शिकायचो. माझी आई मराठी शिक्षिका असूनही मी मराठी विषयात नापास होत असे आणि अक्षयला माझ्यापेक्षा जास्त गुण मिळायचे. त्यामुळे तो विषयात नेहमी अव्वल यायचा. त्याला मराठी भाषेवर नेहमीच अपार प्रेम होते.

यानंतर अक्षयने त्याच्या मुंबईतील सुरुवातीच्या दिवसांबद्दल सांगितले. मी पूर्वी मुंबईतील सायन कोळीवाडा परिसरात राहायचो. मला नेहमी वाटायचं की मराठी शिकायला आणि समजायला सर्वात सोपी भाषा आहे आणि म्हणूनच मला ती शिकायला आवडायची. पण रवीची आई शिक्षिका असूनही त्याला त्यात कमी गुण कसे पडायचे, असा प्रश्न मला अजूनही पडतो, असे अक्षय म्हणाला.

“जा सिमरन जा, जी ले अपनी जिंदगी…”, कुशल बद्रिकेची पत्नीसाठी खास पोस्ट

दरम्यान चला हवा येऊ द्या च्या मंचावर नेहमीप्रमाणे अक्षय कुमारचा मराठमोळा अंदाज देखील प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. तसंच खिलाडी कुमार मंचावर आला आहे म्हणून विनोदवीरांनी देखील कल्ला केला. त्यासोबत अनेक विनोदवीरांसोबत अक्षयसोबत मिळून खूप धमाल केली. अक्षय सध्या तो बच्चन पांडे या चित्रपटामुळे चर्चेत आहे. ‘बच्चन पांडे’ फरहाद सामजी यांनी दिग्दर्शित केला आहे. तर साजिद नाडियादवाला यांनी याची निर्मिती केली आहे. अक्षय व्यतिरिक्त या चित्रपटात अर्शद वारसी, क्रिती सेनन आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्याही भूमिका आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chala hawa yeu dya akshay kumar childhood friend ravi reveals the he was a topper in marathi during school nrp
Show comments