‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामुळे घराघरांत पोहोचलेला अभिनेता म्हणजे कुशल बद्रिके. कुशल आजवर प्रेक्षकांना खळखळून हसवण्यात यशस्वी ठरला. चित्रपट, कार्यक्रमाच्यानिमित्ताने कुशल प्रेक्षकांचं मनोरंजन तर करतोच. पण त्याचबरोबरीने सोशल मीडियाच्या माध्यमातूनही तो प्रेक्षकांना हसवण्याचा प्रयत्न करतो. सोशल मीडियावर सक्रिय असणारा कुशल पत्नी आणि मुलाबरोबरचे गंमतीशीर व्हिडीओ शेअर करताना दिसतो. आता देखील त्याने असाच एक व्हिडीओ शेअर केला आहे.

आणखी वाचा – “ताज हॉटेलमध्ये पहिल्यांदा गेले अन्…” एका चहाची किंमत पाहून हेमांगी कवीच्या भुवया उंचावल्या

bride told love story through ukhana
“पहिल्याच भेटीत लग्नासाठी नाही म्हटले ..” उखाणा घेत नवरीने सांगितली भन्नाट लव्हस्टोरी, VIDEO एकदा पाहाच
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Aai Kuthe Kay Karte Fame Kaumudi Walokar Sangeet Ceremony
Video : “कौमुदी या अखंड ताऱ्यांच्या…”, फिल्मी स्टाइल प्रपोज, जबरदस्त डान्स अन्…; मराठी अभिनेत्रीचा ‘असा’ पार पडला संगीत सोहळा
Devar bhabhi Dance in marriage women started dancing on his devar entry trending video
VIDEO: “लो चली मै अपने देवर की बारात लेके” दीराच्या लग्नात वहिनीचीच चर्चा; असा डान्स केला की पाहुणेही झाले थक्क
uncle aunty amazing dance on tauba tauba song
तौबा तौबा! काका काकूंनी केला जबरदस्त डान्स; Viral Video एकदा पाहाच
Deepika Ranveer reveals daughter Dua face
Video: रणवीर सिंह-दीपिका पादुकोणने दाखवला लेकीचा चेहरा, खास ‘या’ लोकांसाठी ठेवली पार्टी
Woman describes Her sad Marriage Journey Through Unique Mehendi Design
लग्नापासून ते घटस्फोटापर्यंत; महिलेनी मेहेंदीमध्ये सांगितला दु:खद प्रवास, Video होतोय व्हायरल
Video of couple kissing metro station platform
मेट्रो स्टेशनवर ‘किस’ करणाऱ्या जोडप्याचा ‘तो’ Video Viral; नेटकरी म्हणे, “यात गैर काय”

कुशल आपल्या कामामध्ये कितीही व्यग्र असला तरी कुटुंबाबरोबर एकत्रित वेळ घालवणं कधीही चुकवत नाही. इतकंच नव्हे तर कुटुंबियांबरोबर तो अनेकदा धमाल-मस्ती करताना दिसतो. कुशल शेअर करत असलेल्या व्हिडीओमध्ये त्याच्या पत्नीचाही समावेश असतो. कुशलचा हा नवा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल.

पाहा व्हिडीओ

त्याचं झालं असं की कुशल आपल्या पत्नीसह प्रवास करत असताना ट्रॅफिकमध्ये अडकला. मग या मिळालेल्या वेळेमध्ये त्याच्या पत्नीने ‘प्यार किया तो डरना क्या’ हे गाणं लावलं. आणि ती चक्क या गाण्यावर गाडीमध्येच नाचू लागली. मग काय बायको गाडीमध्ये नाचते हे पाहून तिचा व्हिडीओ काढण्याचा मोह देखील कुशलला आवरला नाही. त्याने तिचा हाच व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे.

आणखी वाचा – Video : सोनाली फोगट मृत्य प्रकरण, पार्टीदरम्यानचा आणखी एक व्हिडीओ समोर

हा व्हिडीओ शेअर करत तो म्हणाला, “प्रवास म्हटलं की ट्रॅफिक लागणारच. त्यात वेळ जात नाही म्हणून असं कोण वागतं यार. तुमचा वेळ जातो ओ. इथे आमचा जीव…जाऊ दे चल आता तो विषय नको.” कुशलच्या या व्हिडीओला काही तासांमध्येच नेटकऱ्यांनी बरीच पसंती दिली आहे. तुम्ही हिंमत करून हा व्हिडीओ पोस्ट केला आहे, घरी गेल्यानंतर तुमचं काही खरं नाही अशा अनेक गंमतीशीर कमेंट हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

Story img Loader