मराठी प्रेक्षकांना खळखळून हसवून त्यांचे मनोरंजन करणारा आणि सोबतीला मराठी चित्रपट आणि नाटकांना प्रसिद्धचे एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देणारा ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम घराघरांत लोकप्रिय झाला. थुकरटवाडी गावातील ही अतरंगी मंडळी सोमवार आणि मंगळवारी रात्री ९.३० ला प्रेक्षकांच्या भेटीस येतात आणि पुढचा एक तास निखळ मनोरंजन करणार याची जणू खात्रीच देतात. जवळपास दीड वर्षांपासून अव्याहतपणे चालणारी विनोदाची ही हवा आता वादळाचं रूप घेत असून हे वादळ परदेशापर्यंत पोहचले आहे. कारण ‘चला हवा येऊ द्या’ ची टीम आता लंडनवारीसाठी जाणार आहे .

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वाचा : ढिंच्याक पूजावर आमिरची धक्कादायक प्रतिक्रिया!

येत्या १२ नोव्हेंबरला ‘चला हवा येऊ द्या’ ची टीम लंडनच्या ‘ट्रॉक्सी थिएटर’मध्ये खास शो करणार आहे. डॉ. नीलेश साबळे, भाऊ कदम, कुशल बद्रीके, श्रेया बुगडे, सागर कारंडे, भारत गणेशपुरे हे कलावंत लंडनमधील शोमध्ये सहभागी होतील. लंडनमधील ‘बाराखडी एण्टरटेन्मेन्टस्’चे संचालक अमोघ धामणकर, गंधार बाबरे यांनी ही माहिती दिली. ’ट्रॉक्सी’ हे प्रख्यात थिएटर असून, तेथे यापूर्वी डॅनी बॉयल (स्लम डॉग मिलेनियर), रिचर्ड ब्रॅनसन (व्हर्जिन ग्रुप) अशा दिग्गजांनी शो केले आहेत.

वाचा : …म्हणून अक्षयने ‘त्या’ रिक्षाचा फोटो केला शेअर

‘बाराखडी एण्टरटेन्मेन्टस्’ने नोव्हेंबर २०१६ मध्ये ‘लई बाराचे’ हा कार्यक्रम चार ठिकाणी सादर केला होता. त्यात कुशल बद्रीके, भाऊ कदम, मंगेश देसाई, संतोष जुवेकर, विजू माने यांचा समावेश होता. ‘स्ट्रगलर साला’ या कॉमेडी शोच्या चित्रीकरणातही त्यांनी लंडनमध्ये मदत केली होती.