चित्रपटसृष्टी आणि मनोरंजनच्या क्षेत्रातील दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील कलाकारांना सतत चाहत्यांच्या चर्चेत न राहिल्यास विस्मरणात जाण्याची भिती लागून राहिलेली असते. त्यासाठी ते काहीना काही उपद्व्याप करत असतात. ‘मिस श्रीलंका’ आणि ‘ग्रॅण्ड मस्ती’ चित्रपटातील अभिनेत्री चांदी परेराने ख्रिसमसच्या तोंडावर या वर्षी पहिल्यांदाच आपल्या शरीरावर ख्रिसमसचे ‘बॉडी पेन्ट’ करून घेतले आहे. ‘बॉडी पेंटर’ नहुषने मुंबईतील ‘नृत्यवाटिका’ स्टुडिओमध्ये हे ‘बॉडी पेंट’ केले. अलीकडेच चांदी परेराने अजय देवगणबरोबर एका जाहिरातीतसुद्धा काम केले आहे. नृत्य शिकत असलेल्या चांदीने मुंबईत दोन ‘डान्स शो’ देखील केले. ‘मेरी ख्रिसमस!’ म्हणत बॉडी पेंटद्वारे सर्वांना ख्रिसमसच्या शुभेच्छा देण्यात अग्रक्रम लावण्याची चांदी परेराची इच्छा आहे.

Story img Loader