बॉलिवूडमधील बोल्ड अभिनेत्रींच्या यादीमधील एक नाव म्हणजे वाणी कपूर. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या चित्रपटात काम करत वाणीने करिअरला सुरुवात केली होती. तिने काही चित्रपटांमध्ये बोल्ड आणि लव्ह मेकिंग सीन दिले आहेत. पण तिने दिलेले सीन विशेष चर्चेत होते. आता एका मुलाखतीमध्ये वाणीने किसिंग आणि बोल्ड सीन देण्याबाबत वक्तव्य केले आहे.

वाणीने नुकतीच टाइम्स ऑफ इंडियाला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिला चंदीगढ करे आशिकी, बेफ्रिके आणि वॉर या चित्रपटांमध्ये लव्हमेकिंग आणि इंटिमेट सीन देणे कितपत योग्य वाटलं? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर वाणीने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
आणखी वाचा : मालदिवमध्ये शार्कसोबत एन्जॉय करतेय सनी लिओनी, हा व्हिडीओ पाहिलात का?

‘चंदीगढ करे आशिकी चित्रपटातील इंटिमेट सीन हे काही कारणास्तव शूट करण्यात आले होते. वॉर, बेफिक्रे आणि चंदीगढ करे आशिकीमधील कोणतेही सीन हार्डकोअर लव्हमेकिंग सीन नव्हते. पण इंटिमेट सीन शूट करताना काळजी घ्यावी लागते. ते सीन शूट करणे सोपे नसते’ असे वाणी म्हणाली.

पुढे ती म्हणाली, ‘माझ्यासाठी दिग्दर्शकावर विश्वास असणे फार महत्त्वाचे आहे. जर मला थोडे जाणवले की हा दिग्दर्शक ठिक नाही किंवा माझा एखाद्या दिग्दर्शकावर विश्वास नसेल तर मी त्यांच्यासोबत काम करण्यात नकार देते.’

Story img Loader