सध्या सर्वत्र ‘चंद्रमुखी’चा बोलबाला आहे. या सौंदर्यवतीने सर्वांवर जादू केली आहे. आपल्या दिलखेचक सौंदर्याने, नृत्याने सर्वांना घायाळ करणारी ‘चंद्रा’ आता सवाल जवाबचा तडका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यात अमृता खानविलकर आणि प्राजक्ता माळीमध्ये रंगलेली जबरदस्त जुगलबंदी पाहायला मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यापर्वी या चित्रपटातील ठुमकेदार लावणी, तरल प्रेमगीत, श्रृंगाराने सजलेल्या चंद्राची बैठकीची लावणी आपल्या समोर आली आहे. आता सवाल जवाबचा फड रंगला आहे. या लावणीला गुरू ठाकूर यांनी शब्दबद्ध केले असून त्याला अजय-अतुल यांचे दमदार संगीत लाभले आहे. तर मधुरा दातार, प्रियांका बर्वे आणि विश्वजीत बोरवणकर यांच्या आवाजाने रंगत आणली आहे. दिपाली विचारे यांचे नृत्यदिग्दर्शन असलेला हा ठसकेदार लावणीचा प्रकार आता प्रेक्षकांना भुरळ घालत आहे.

आणखी वाचा : दाक्षिणात्य चित्रपटांच्या रिमेकवर अभिषेक बच्चनने केले वक्तव्य, म्हणाला…

आणखी वाचा : ‘धर्मवीर’ चित्रपटात बाळासाहेबांची भूमिका साकारणारा अभिनेता, कोण आहे माहितीये का?

चित्रपटाचे दिग्दर्शक प्रसाद ओक म्हणतात, “या चित्रपटात आम्ही श्रृंगारीक लावणी, बैठकीची लावणी, सवाल जवाब असे लावणीचे विविध प्रकार दाखवले आहेत. या निमित्ताने लोककलेचा समृध्द वारसा पुन्हा प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. ‘चंद्रमुखी’तील इतर गाण्यांप्रमाणे सवाल जवाबची रंगलेली ही चुरसही रसिकांना भावेल.”

आणखी वाचा : योगा शिबिरात भेट ते सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न, नवनीत राणा यांची ‘प्यार वाली लव्हस्टोरी’

आणखी वाचा : ऐश्वर्या अभिषेक आणि दीपिकासोबत डान्स करताना झाली बेधुंद…, पाहा Video

प्रसाद ओक दिग्दर्शित, चिन्मय मांडलेकर लिखित या चित्रपटात अमृता खानविलकर, आदिनाथ कोठारे, मृण्मयी देशपांडे, मोहन आगाशे, राजेंद्र शिसतकर, समीर चौघुले, अशोक शिंदे, नेहा दंडाळे, राधा सागर यांच्यासह अनेक कलाकार आहेत. तर चित्रपटाचे छायाचित्रण संजय मेमाणे यांनी केले आहे. अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्म्स निर्मित, क्रिएटिव्ह वाईब प्रॅाडक्शन प्रस्तुत फ्लाईंग ड्रॅगन एंटरटेनमेंट, येलस्टार फिल्म्स, लाईटविदिन एंटरटेनमेंट सहप्रस्तुत ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट येत्या २९ एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.