विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कादंबरीवर आधारित बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटात दिलखेचक अदांनी सर्वांना घायाळ करणाऱ्या नृत्यांगणेची प्रमुख भूमिका अभिनेत्री अमृता खानविलकर साकारत आहे. तर दौलत देशमानेच्या भूमिकेत आदिनाथ कोठारे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सध्या या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरु आहे. नुकतंच या चित्रपटाच्या टीमने प्रमोशनसाठी हटके युक्ती निवडली आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनासाठी अमृताने चक्क पुणे मेट्रोत ‘चंद्रा’ या गाण्यावर ठेका धरला आहे.

अमृता खानविलकरने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अमृता खानविलकर ही पुणे मेट्रोत चंद्रा या गाण्यावर नाचताना दिसत आहे. तिच्यासोबत या मेट्रोमध्ये प्रवास करणाऱ्या पुणेकरांनीही ठेका धरला आहे. या मेट्रोत प्रवास करणारे अनेक प्रवाशीही या ठिकाणी नाचताना दिसत आहेत. यावेळी अभिनेता आदिनाथ कोठारेही उपस्थित असल्याचे पाहायला मिळत आहे.

Aai Kuthe Kay Karte Fame Kaumudi Walokar Sangeet Ceremony
Video : “कौमुदी या अखंड ताऱ्यांच्या…”, फिल्मी स्टाइल प्रपोज, जबरदस्त डान्स अन्…; मराठी अभिनेत्रीचा ‘असा’ पार पडला संगीत सोहळा
IND vs AUS Usman Khawaja Reveals How He Stop Virat Kohli Sam Konstas Fight on Field Melbourne
IND vs AUS: “मी विराटला ओळखतो…,” कॉन्स्टास-कोहलीमध्ये मैदानात…
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “आमच्याकडे मान-अपमान मनात होतो अन् त्याचं संगीत…”, देवेंद्र फडणवीसांची टोलेबाजी!
Video : पॅकअप होताच मृणाल ठाकूरचा आनंद गगनात मावेना, ‘पुष्पा २’ चित्रपटातील ‘पीलिंग्स’ गाण्यावर रील करत केली धमाल
Paaru
Video : “देवा, या जंगलात मी…”, जंगलात हरवलेल्या पारूवर संकट येणार? आदित्य पारूला वाचवू शकणार का? मालिकेत ट्विस्ट
Nana Patekar Aamir Khan Video viral
Video: मैत्री असावी तर अशी! नाना पाटेकर व आमिर खानचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, नेटकरी साधेपणाचं करताहेत कौतुक
pataal lok seson 2 new promo
Video : “मौसम बदलने वाला है…”; ‘पाताल लोक २’ चा प्रोमो आला प्रेक्षकांच्या भेटीला, हाथीराम चौधरीच्या मानेवरील ‘ती’ तारीख पाहून नेटकरी म्हणाले…
tharala tar mag fame actor mayur khandge started new initiative
“शेतकऱ्यांसाठी एक पाऊल पुढे…”, ‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्याचा स्तुत्य उपक्रम; पोस्टद्वारे दिली महत्त्वाची माहिती

“करवटें बदलते रहें सारी रात, कोणामुळे ते विचारु नका…”; प्राजक्ता माळीची हटके पोस्ट चर्चेत

विशेष म्हणजे चंद्रा या गाण्यावर नाचून झाल्यानंतर ती फार आनंदी असल्याचे पाहायला मिळत होते. तसेच पुणेकरांनी टाळ्या वाजवून अमृताच्या ‘चंद्रा’ गाण्याला दाद दिली. या प्रसंगी अमृता आणि आदिनाथ यांनी पुणेकरांना २९ एप्रिलला चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे. सध्या चंद्रमुखी चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरु आहे.

दरम्यान आपल्या मोहमयी नजाकतीने अमृताने या चित्रपटातील लावण्यातीने सर्वांचीच मने जिंकली. याला अजय -अतुल यांच्या दमदार संगीताची साथ लाभली आहे. सध्या सोशल मीडियावर ‘चंद्रा’ या गाण्याच्या नृत्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहेत. अमृता खानविलकर हिने ज्याप्रमाणे ‘चंद्रा’ प्रेक्षकांसमोर सादर केली. त्याला तोड नाही. तिची ही अदा पाहून सामान्य प्रेक्षकांसह अनेक मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारही ‘चंद्रा’वर ठेका धरताना दिसत आहेत.

“कच्चा बदाम खाऊन मला अशी अक्कल आली की…”, अमेय वाघची ‘ती’ पोस्ट चर्चेत

‘चंद्रमुखी’ हा चित्रपट लेखक विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कांदबरीवर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओक यांनी केले आहे. तर पटकथा-संवाद चिन्मय मांडलेकर यांचे आहेत. या चित्रपटात दमदार दौलतच्या भूमिकेत आदिनाथ कोठारे दिसणार आहे. तर चंद्राच्या भूमिकेत अमृता खानविलकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाला अजय -अतुल यांचे जबरदस्त संगीत लाभले आहे. दरम्यान ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट येत्या २९ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

Story img Loader