मराठीतील सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून अमृता खानविलकरला ओळखले जाते. उत्तम अभिनय, कमालीचा डान्स आणि प्रत्येक भूमिकेला न्याय देणारी अभिनेत्री म्हणून तिची खास ओळख आहे. मराठी सिनेसृष्टीत अमृताचं नाव जितकं चर्चेत असतं तितकीच तिच्या नावाची चर्चा बॉलिवूडमध्येही असते. अमृताने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट, मालिका, वेबसीरीजमध्ये काम केले आहे. सध्या ती ‘चंद्रमुखी’ या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच हिट होताना दिसत आहे.

अमृता खानविलकर ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती नेहमी विविध पोस्ट शेअर करताना दिसते. नुकतंच अमृता खानविलकर हिने प्रसाद ओकसाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये अमृता खानविलकरने चंद्रमुखी चित्रपटातील शूटींगदरम्यानचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ सवाल जवाब या लावणीदरम्यानचा आहे. या व्हिडीओत प्रसाद ओक हा अमृताला कशाप्रकारे नृत्य करायचे, याबाबत सांगताना दिसत आहे. तर दुसऱ्या व्हिडीओत ती अमृता ही हुबेहुब नाचताना दिसत आहे.

Tejaswini Pandit
“माझ्या बालमित्राने मला…”, सुंदर साडीतील फोटोंमध्ये तेजस्विनी पंडितची खास पोस्ट; म्हणाली, “माझं न संपणारं प्रेम…”
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
kshitee jog
“एक झिम्मा चालला म्हणजे…”, क्षिती जोग ‘त्या’ चित्रपटाच्या अपयशावर काय म्हणाली?
selena gomez crying video america imigration policy
Video : “माझ्या लोकांवर हल्ले…”; डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘त्या’ निर्णयामुळे रडली सेलेना गोमेझ, नेमकं काय घडलं?
Ajit Pawar On Suresh Dhas
Ajit Pawar : “सुरेश धसांना काय वाटतं याच्याशी देणंघेणं नाही”, अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “खालचे कार्यकर्ते…”
netizen troll to marathi singer juilee joglekar for her kandepohe performance
Video: “वेगळं काय तरी करा…”; जुईली जोगळेकरच्या ‘त्या’ परफॉर्मन्सवर नेटकऱ्याची खोचक प्रतिक्रिया, गायिका म्हणाली…
r madhavan on six pack abs
“माझ्याकडे सिक्स पॅक्स नाहीत, मला डान्सही येत नाही तरीही…”; २५ वर्षे सिनेसृष्टीत काम करणाऱ्या बॉलीवूड अभिनेत्याचं वक्तव्य चर्चेत
Zeenat Aman shares her pill swallowing horror story
“औषध घेताना गोळी घशात अडकली अन् माझा श्वास…..”; झीनत अमानने सांगितला भयावह किस्सा; तुमच्याबरोबर असे घडले, तर काय करावे?

‘चंद्रमुखी’ चित्रपटाच्या कमाईत घसघशीत वाढ, पाच दिवसात कमावले इतके कोटी

अमृता खानविलकरची इन्स्टाग्राम पोस्ट

“चंद्रा सांगते एका…, किती वर्णू ग महिमा त्याचा ….. ह्या एका वाक्यात सगळं आलं …. प्रसाद ओक…कादंबरी देण्यापासून ते हे शेवटचं गाणं करण्यापर्यंत … तू जे जे केलंस त्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत ….. मला स्वतःशी ओळख करून देण्यासाठी मी आयुष्यभर तुझी ऋणी राहीन…”, असे कॅप्शन अमृताने या पोस्टला दिले आहे. तिची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.

राणादा आणि पाठकबाईंच्या साखरपुड्यावर एक्स बॉयफ्रेंडची पहिली प्रतिक्रिया, अक्षया देवधर म्हणाली…

दरम्यान अमृता खानविलकर ही सध्या चंद्रमुखी या चित्रपटामुळे चर्चेत आहे. ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट लेखक विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कांदबरीवर आधारित आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर १.२१ कोटींची कमाई केली आहे. तर पाच दिवसात या चित्रपटाने जवळपास ६.२१ कोटींचा गल्ला जमवला आहे.

सध्या या चित्रपटाचे सर्व शो हाऊसफुल असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तसेच हा चित्रपट मराठी चित्रपटाच्या यशातील एक महत्वाचा चित्रपट ठरताना दिसत आहे. तसेच जागतिक पातळीवरही हा चित्रपट सुपरहिट ठरताना दिसत आहे.

Story img Loader