विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कादंबरीवर आधारित ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटात अमृता खानविलकर आणि आदिनाथ कोठारे यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील गाणी, पोस्टर, ट्रेलर, टिझर सर्वच चर्चेचा विषय ठरत आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अनेक समीक्षकांनी या चित्रपटाचे कौतुक करताना दिसत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आहे. पण तुम्हाला माहितीय का? चंद्रमुखी या कादंबरीवर चित्रपटाऐवजी मालिकेची निर्मिती केली जाणार होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमृता खानविलकर आणि आदिनाथ कोठारे यांची प्रमुख भूमिका असलेला चंद्रमुखी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर एक वेगळीच जादू निर्माण केली आहे. प्रसाद ओक दिग्दर्शित चंद्रमुखी हा चित्रपट दोन दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने मुंबई आणि महाराष्ट्रासह देशभरातील प्रेक्षकांची मने जिंकली आहे. अवघ्या दोन दिवसात हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे.

Chandramukhi box office collection : ‘चंद्रमुखी’तील चंद्रा आणि दौलतरावची प्रेक्षकांना भुरळ, पहिल्या दिवशी कमावले इतके कोटी

पण नुकतंच मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रमुखी या कादंबरीवर एका मालिकेची निर्मिती केली जाणार होती. या मालिकेचे नावही चंद्रमुखी ठेवण्यात येणार होते. यात दौलतराव ही भूमिका अभिनेता सुबोध भावे साकारणार होता.

मात्र वाहिनीकडून मालिकेच्या प्रस्तावाला मंजुरी मिळण्यासाठी उशीर झाला. त्यामुळे या मालिकेचा प्रस्ताव बारगळला. त्यानंतर या कांदबरीवर चित्रपटाची निर्मिती करण्यात आली. सध्या हा चित्रपट चांगलाच सुपरहिट ठरत असल्याचे दिसत आहे, अशी माहिती मराठी सिरियल या इन्सटाग्राम पेजने दिली आहे.

‘चंद्रमुखी’ हा चित्रपट लेखक विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कांदबरीवर आधारित आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर १.२१ कोटींची कमाई केली आहे. सध्या या चित्रपटाचे सर्व शो हाऊसफुल असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. तसेच हा चित्रपट मराठी चित्रपटाच्या यशातील एक महत्वाचा चित्रपट ठरताना दिसत आहे. तसेच जागतिक पातळीवरही हा चित्रपट सुपरहिट ठरताना दिसत आहे.

आमिर खानच्या मुलगी इरा आहे गंभीर आजाराने ग्रस्त, म्हणाली “यापूर्वी कधीही मला…”

या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओकने केले आहे. तर पटकथा-संवाद चिन्मय मांडलेकर याचे आहे. या चित्रपटात दमदार दौलतच्या भूमिकेत आदिनाथ कोठारे दिसत आहे. तर चंद्राच्या भूमिकेत अमृता खानविलकर पाहायला मिळत आहे. आपल्या मोहमयी नजाकतीने अमृताने या चित्रपटातील लावण्यांद्वारे सर्वांचीच मने जिंकली आहे. याला अजय -अतुल यांच्या दमदार संगीताची साथ लाभली आहे.