charlie02
ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह ‘चार्ली के चक्कर में’ या आगामी चित्रपटात अभिनय करताना दिसणार आहेत. या चित्रपटात नसिरुद्दीन शाह यांच्याबरोबर अनेक नवोदीत कलाकार अभिनय करत असून, नसिरुद्दीन शाह चित्रपटात पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहेत. चित्रपटाची कथा ही करण कुमार कक्कर हत्या प्रकरणाशी मिळती-जुळती असली, तरी सदर घटना घडण्यापूर्वी या चित्रपटाची कथा लिहिण्यात आली असल्याचे चित्रपटकर्त्यांचे म्हणणे आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहून हा चित्रपट रहस्यमय घटनांनी भरलेला असल्याचे जाणवते. चित्रपटकर्त्यांनी मोठ्या खुबीने चित्रपटाच्या नावात ‘चार्ली’ शब्दाचा वापर केला आहे. अनेकांना ‘चार्ली’ हे एखाद्या व्यक्तिचे नाव वाटू शकते. परंतू कोकेन नावाचा अमली पदार्थ ‘चार्ली’ नावानेदेखील ओळखला जातो. निर्माता करण अरोरा आणि दिग्दर्शक मनिष श्रिवास्तव यांचा हा रहस्यमय थरारपट ६ नोव्हेंबरला चित्रपटगृहात झळकणार आहे. पाहा चित्रपटाचा ट्रेलर.

charlie-01

Story img Loader