काही कलाकारांबाबत वेगळ्या स्वरुपाच्या गोष्टी घडतात आणि त्यातूनच त्यांचा आपल्या कारकिर्दीतील हुरुप वाढतो. अमित सियल याच्याबाबत तसेच झाले. काही वर्षापूर्वी त्याला नसिरुद्दीन शाहसोबत हिंदी रंगभूमीवर वावरताना अभिनय आणि आपल्या कामाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन अशा गोष्टी शिकता आल्या. त्याच नसिरसोबत त्याला करण अरोरा निर्मित ‘चार्ली के चक्कर में’ थ्रिलर चित्रपटातून भूमिका साकारायची संधी मिळाली.
अमित यावर सांगतो, पूर्वानुभव असल्यानेच या चित्रपटाच्या वेळी सेटवर मी सहजगत्या वावरलो आणि असे असूनही यावेळी नसिरकडून काही नवीन गोष्टीदेखील शिकता आल्या. विशेषत: दृष्यमाध्यमाचा कसा विचार करावा आणि कॅमेऱ्याचे भान कसे असावे / नसावे हे दोन्ही शिकलो. दिग्दर्शक मनिष श्रीवास्तव हा मित्र असल्याने एकदा गप्पांतच्या ओघात या चित्रपटाची कल्पना सुचली. हव्यासातून चार-पाच मित्रांचे आयुष्य कसे घडत जाते याभोवती हा रोमांचक चित्रपट आहे. मूळचा कानपूरचा असल्याने माझे हिंदी खूप चांगले आहे आणि अमिताभजी माझे आदर्श आहेत. अकरा वर्षाच्या कारकिर्दीत मॉडेलिंग आणि अभिनय करत चित्रपटांची संख्या हळूहळू वाढतेय. आता मला स्वत:ची ओळखही सापडेल असा विश्वास आहे, अमित गप्पा संपवत म्हणतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा