अभिनेत्री सुश्मिता सेनचा भाऊ राजीव सेन आणि टीव्ही अभिनेत्री चारू असोपा यांच्यातील वाद गेल्या काही काळापासून सातत्याने चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी त्या दोघांमधील संबंध सुधारल्याचे बोललं जात होतं. मात्र त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केले होते. त्यामुळे त्याच्यात पुन्हा एकदा दुरावा आल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र आता नुकतंच चारू आसोपाने एकमेकांना अनफॉलो केल्याच्या चर्चांवर मौन सोडले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

राजीव आणि चारू यांनी काही दिवसांपूर्वीच फॅमिली फोटो शेअर करत त्यांनी घटस्फोटाचा निर्णय बदलला असल्याची आणि लग्नाला दुसरी संधी देत असल्याची घोषणा केली होती. यानंतर दोघंही पुन्हा प्रेमाने राहत असलेले पाहायला मिळाले. एकत्र जीमला जाणे, आऊटिंग करणे, फॅमिली पार्टी आणि कार्यक्रमात एकत्र सहभागी झाले होते. त्यानंतर त्यांनी अनेक फोटोही शेअर केले होते. मात्र काही दिवसांनी त्यांनी एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केलं आहे. त्यावर नुकतंच चारु आसोपाने स्पष्टीकरण दिले आहे. मी त्याला अनफॉलो केलेले नाही. तर राजीवने मला ब्लॉक केले आहे, असा दावा चारुने केला आहे.
आणखी वाचा : “१ जूनला आम्ही ग्रुप बनवला अन् १४ दिवसांनी…” सुशांत सिंह राजपूतबद्दल बोलताना प्रार्थना बेहरेने व्यक्त केली खंत

हिंदुस्ताना टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत चारु आसोपा म्हणाली, मी राजीवला अनफॉलो केलेले नाही. त्याने मला ब्लॉक केले आहे. तो दिल्लीला गेला आहे आणि तिथे गेल्यानंतर त्याने मला ब्लॉक केले. तो तिथे कशासाठी गेला आहे, कुठे आहे, याबद्दल मला काहीही माहिती नाही. पण दिल्लीत गेल्यापासून माझ्या त्याच्याशी कोणत्याही प्रकारे संपर्क झालेला नाही.

राजीवच्या या अशा वागण्याला मी खूप कंटाळली आहे. मी फार निराश झाली आहे. आम्ही आमच्या नात्यातील अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करत होता. त्यासाठी आम्ही एक संधी देत होतो. पण ते करणं गरजेचे आहे, असे मला आता अजिबात वाटत नाही, असेही तिने म्हटले.

आणखी वाचा : सुश्मिता सेनच्या भावाचे पत्नी चारू असोपाशी वाद संपेनात, फोटो डिलिट केले अन्…

दरम्यान चारू असोपा ही सध्या तिच्या गावी बीकानेरला आहे. याच ठिकाणी तिने मुलगी जियानासाठी प्री-बर्थडे पार्टी ठेवली होती. “ येत्या १ नोव्हेंबरला जियाना १ वर्षाची होणार आहे. त्यासाठी आम्ही मुंबईमध्ये पार्टी ठेवणार आहोत. पण त्याआधी माझे आई-बाबा आणि भावंडांसाठी गावी एक छोटीशी पार्टी आयोजित करायची होती. आम्ही त्यासाठी बरीच शॉपिंग केली. डिनरसाठी बाहेर गेलो आणि खूप धम्माल केली. माझ्या आई-बाबांचं त्यांच्या नातीवर खूप प्रेम आहे.” असे चारुने यावेळी म्हटले.