फँड्री’, ‘सैराट’, झुंड, ‘रेडू’ ते ‘लापता लेडीज’ अशा चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री म्हणजेच छाया कदम या सध्या ‘लापता लेडीज’ या चित्रपटातील खास भूमिकेमुळे चर्चेत आहेत. हिंदी चित्रपटामध्ये नावीन्यपूर्ण भूमिका साकारून त्यांनी या क्षेत्रात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. मराठी नाटकापासून सुरू झालेला त्यांचा अभिनयाचा प्रवास कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवापर्यंत पोहोचला आहे. या प्रवासाबद्दल ‘लोकसत्ता’च्या ‘डिजिटल अड्डा’मध्ये अभिनेत्री छाया कदम यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. तसेच त्यांनी ‘लापता लेडीज’ चित्रपटातील त्यांच्या भूमिकेविषयी माहिती दिली आणि चित्रपटाच्या सेटवरील अनेक किस्से सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

छाया कदम यांन नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘झुंड’ चित्रपटात बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करायला मिळाली होती. या चित्रपटात त्यांनी विजय बोराडे (अमिताभ बच्चन) यांच्या पत्नीची (रंजना बोराडे) भूमिका साकारली होती. तसेच सध्या देशभरात दिग्दर्शिका आणि निर्माती किरण राव यांच्या ‘लापता लेडीज’ या चित्रपटाची चर्चा आहे. या चित्रपटात छाया कदम यांनी ‘मंजू माई’ ही व्यक्तीरेखा साकारली असून छाया कदम यांना देशभर प्रेम मिळत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chaya kadam inspirational journey marathi movies bollywood to cannes with laapataa ladies asc