इमरान हाश्मीचा ‘चीट इंडिया’ चित्रपट पुढील आठवड्यात प्रदर्शित होत आहे. पण चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक आठवडा आधी या चित्रपटाचं शीर्षक बदलण्याचा निर्णय घेतला आहे. आता या चित्रपटाचं नवं नाव ‘ व्हाय चीट इंडिया’ असं असणार आहे.
सेन्सॉर बोर्डनं या चित्रपटाच्या शीर्षकावर आक्षेप घेतला होता, त्यानंतर चित्रपटाच्या नावात बदल करण्यात आला. या चित्रपटाचं शीर्षक दिशाभूल करणारं आहे असं सेन्सॉर बोर्डाचं म्हणणं आहे. इंजीनिअर किंवा मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचा थप्पा मिळवण्यासाठी जो काही गैरकारभार चालतो, कशाप्रकारे डमी विद्यार्थांना परीक्षेसाठी बसवलं जातं, हे सगळं आगामी ‘चीट इंडिया’ या चित्रपटातून समोर येणार आहे. देशाच्या शिक्षणव्यवस्थेतील भ्रष्टाचारावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटात इमरान हाश्मी मुख्य भूमिका साकारत आहे. इमराननं या चित्रपटाचं नवं पोस्टर शेअर केलं आहे, ‘का ते विचारू नका’ अशी ओळ टाकत हटके पद्धतीनं इमराननं चित्रपटचं पोस्टर लाँच केलं आहे.
इमरान हाश्मी फिल्म्स, टी सीरिज, आणि एलिप्सिस एंटरटेन्मेंट निर्मित हा चित्रपट १८ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. ‘ व्हाय चीट इंडिया’ हा चित्रपट आधी २५ जानेवारीला प्रदर्शित होणार होता.