अनेक चित्रपट महोत्सवांत समीक्षकांकडून पसंतीची पावती मिळविल्यानंतर ‘फिल्मीस्तान’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नितीन कक्कर दिग्दर्शित या चित्रपटात बॉलीवूडविषयी कमालीचे आकर्षण असणारा आणि चित्रपटसृष्टीत नाव कमावण्यासाठी धडपडणाऱ्या एका अभिनेत्याच्या संघर्षाचे चित्रण करण्यात आले आहे. या चित्रपटाने सन २०१२मध्ये राष्ट्रीय पुरस्कारांच्या यादीतसुद्धा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान मिळवला होता. अनेकांना उत्सुकता असलेल्या ‘फिल्मीस्तान’च्या पहिल्या पोस्टरचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले. बॉलीवूडमधील प्रसिद्ध व्यक्तिमत्वांना मिळणारा देवत्वाचा दर्जा आणि सर्वसामान्यांमध्ये बॉलीवूडविषयी असणारे वेड हे दोन्ही घटक ‘फिल्मीस्तान’च्या पोस्टरवर साकारण्यात आले आहेत. ‘फिल्मीस्तान’च्या या अनोख्या पोस्टरमुळे चित्रपटाविषयीची उत्कंठा आणखीनच ताणली गेली आहे. येत्या ६ जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.   
 

Story img Loader