सुपरस्टार रजनीकांत गेली अनेक वर्ष चित्रपट सृष्टी गाजवत आले आहेत. त्यांची प्रत्येक भूमिका प्रेक्षकांना भुरळ घालते. त्यांचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे त्यांचे जगभरात करोडो चाहते आहेत. त्यांच्यासाठी आणि त्यांच्या चित्रपटांसाठी त्यांचे चाहते अक्षरशः काहीही करायला तयार असतात. तर आता त्यांच्या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने कंपन्यांना चक्क सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रजनीकांत त्यांच्या आगामी ‘जेलर’ या चित्रपटासाठी सध्या खूप चर्चेत आहेत. ‘जेलर’मध्य रजनीकांतसह जैकी श्रॉफ, शिवा राजकुमार, सुनील, तमन्ना भाटिया, राम्या कृष्णन, मिरना मेनन, योगी बाबू आणि विनायकनसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट १० ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. या निमित्त आता बेंगळुरू, चेन्नई या शहरांमधील काही कंपन्यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

आणखी वाचा : रजनीकांत यांच्या घरी असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो पाहिलात का? लेकीने केलेली पोस्ट चर्चेत

मीडिया रिपोर्टनुसार, बेंगळुरू आणि चेन्नई येथील काही ऑफिसेसमध्ये कर्मचाऱ्यांना १० ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याचं कारण म्हणजे रजनीकांत यांचा चित्रपट या दिवशी प्रदर्शित होणार आहे आणि तो सर्वांना पाहता यावा यासाठी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना सुट्टी दिली आहे.

हेही वाचा : अक्षय कुमार नाही तर ‘हे’ अभिनेते आहेत सर्वाधिक मानधन घेणारे भारतीय कलाकार

गेले काही दिवस या चित्रपटाचं ॲडव्हान्स बुकिंग सुरू असून त्याला सर्वत्र खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. न्यूयॉर्कमध्ये रजनीकांत यांचे चाहते या चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला भरभरून प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे आता या चित्रपटाने प्रदर्शनाच्या आधीच ॲडव्हान्स बुकिंग मधून दहा कोटींचा गल्ला जमवला असल्याचं बोललं जात आहे. रजनीकांत यांच्या या चित्रपटासाठी त्यांचे चाहते प्रचंड उत्सुक असून या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chennai and banglore companies declare holiday for employees to watch rajinikanth film jailer rnv
Show comments