साऊथचा सुपरस्टार रजनीकांत यांच्या ‘जेलर’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. हा ट्रेलर पाहून रजनीकांत यांचे चाहते फारच खुश झाले. रजनीकांत यांच्या लूकपासून ते स्टाईलपर्यंत त्यांच्या प्रत्येक गोष्टीचं कौतुक होताना दिसत आहे. ‘जेलर’मध्ये रजनीकांतची या नावाची जादू आणि एकूणच त्यांचा दमदार अंदाज त्यांच्या चाहत्यांना अनुभवायला मिळणार आहे असं ट्रेलरवरुन तरी स्पष्ट दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चित्रपटाची कथा एका जेलरची आहे, ज्याच्या तुरुंगात एका कुविख्यात टोळीमधील एक मोठा गुंड कैद आहे. त्या टोळीतील माणसे जेलरच्या (रजनीकांत) तुरुंगातून त्याची सुटका करण्यासाठी एक योजना आखतात अन् त्यांचा जेलरशी होणारा सामना असं थ्रील आपल्याला पाहायला मिळणार आहे. जेलर मुथुवेल म्हणजेच रजनीकांत अतिशय कठोर तितकेच पण प्रामाणिकही आहेत. पण त्यांची आणखी एक बाजू आहे जी फारच भयंकर आहे आणि त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला याबद्दल ठाऊक नाहीये

आणखी वाचा : काय आहे ‘राजामौली शाप’? ज्यामुळे राम चरण व प्रभासच्या करिअरला लागलं ग्रहण, गैरसमज की अंधश्रद्धा?

केवळ दक्षिणेतच नव्हे तर जगभरात रजनीकांत यांच्या आगामी चित्रपटासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. ‘इकोनॉमीक टाइम्स’च्या रीपोर्टनुसार बेंगलोर आणि चेन्नईमधील बऱ्याच ऑफिसेसमधील कर्मचाऱ्यांना १० ऑगस्ट यादिवशी सुट्टी जाहीर केली आहे. इतकंच नव्हे तर काही कंपन्यांनी तिथे काम करणाऱ्या सहकाऱ्यांना चित्रपटाचं मोफत तिकीटही दिलं आहे.

पायरसीला आळा घालता यासाठी काही कंपन्यांनी मोफत तिकटं वाटप केले आहे. काही कर्मचाऱ्यांच्या आणि कंपनीच्या ट्विटर हॅंडलवर याबद्दल माहिती आपल्याला पाहायला मिळेल. ‘जेलर’मध्ये रजनीकांत पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात तमन्ना भाटिया आणि ‘बाहुबली’ चित्रपटात शिवगामी ही भूमिका साकारणारी अभिनेत्री रम्या कृष्णन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे नाव आधी ‘थलैवर १६९’ असे ठेवण्यात आले होते, परंतु निर्मात्यांनी नंतर ‘जेलर’ हे नाव नक्की केले.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chennai bengaluru offices declare holiday on rajinikanth film jailer release day avn
Show comments