ईदच्या मुहूर्तावर शाहरूखची मुख्य भूमिका असलेला ‘चेन्नई एक्स्प्रेस’ देशभर प्रदर्शित झाला आहे. दिवसाला देशभरातून ३५०० शो तर परदेशात ७०० च्यावर खेळ मांडणाऱ्या चेन्नई एक्स्प्रेसला पहिल्याच दिवशी ९० ते ९२ टक्के प्रतिसाद मिळाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. पहिल्या खेळाला थोडा थंड प्रतिसाद होता. मात्र दुपारनंतर ‘चेन्नई एक्स्प्रेस’ने जोर घेतला. अजून पहिल्या दिवशीचे तिकीटबारीवरचे कमाईचे आकडे हाती आले नसले तरी ‘ईद’चा मुहूर्त साधून आलेला शनिवार- रविवार चित्रपटाला चांगली कमाई करून देईल, असा अंदाज चित्रपटगृह मालकांनी व्यक्त केला आहे.
‘चेन्नई एक्स्प्रेस’ चित्रपटाचे बजेटच १०० कोटींच्या आसपास असल्याने कमाईच्या बाबतीत हा आकडा पार करणे ही निर्मात्यांच्या दृष्टीने मोठी गरज आहे. त्यातली अर्धी लढाई चित्रपटाचे उपग्रह हक्क ५५ ते ६० कोटी रुपयांना विकून त्यांनी जिंकली आहे. त्यामुळे तीन दिवसांत त्यांना १०० कोटींची कमाई करणे फारसे अवघड नाही, असे ट्रेड विश्लेषकांचे म्हणणे आहे. याशिवाय, अमेरिका-इंग्लंड या मुख्य परदेशी बाजारपेठांसह मोरोक्को, जर्मनी, स्वित्र्झलड, ऑस्ट्रिया, फ्रान्स, इस्राएल, पेरू अशा ५० हून अधिक देशात सातशेपेक्षा जास्त खेळ दिवसाला दाखवण्यात येणार आहेत. त्यामुळे आमिरच्या ‘थ्री इडियट्स’ आणि सलमानच्या ‘एक था टायगर’बरोबर या चित्रपटाची थेट तुलना केली जात आहे. यांचे रेकॉर्ड्स ‘चेन्नई एक्स्प्रेस’ने मोडले तर शाहरूखला पुन्हा एकदा बॉलिवूडचा बादशहा म्हणून आपले वर्चस्व प्रस्थापित करता येईल.
या वर्षीची ईद माझ्यासाठी विशेष – शाहरूख खान
सकाळपासून कुटुंबाबरोबर ईद साजरी करण्यात व्यग्र असलेल्या शाहरूखने ही ईद आपल्यासाठी खास असल्याची भावना व्यक्त केली आहे. आज सकाळपासून मी हसत-हसत सगळ्यांकडून अभिनंदनाचा स्वीकार करतो आहे. चित्रपटाने आजच्या दिवसात किती कमाई केली आहे, याचा विचारही मी करणार नाही. रविवापर्यंत चित्रपटाला किती प्रतिसाद मिळतो आहे आणि पुढच्या आठवडय़ातही तो कसा टिकून राहील, याकडे माझे लक्ष लागलेले आहे, असे शाहरूखने सांगितले. ईदच्या निमित्ताने शाहरूखची पत्नी गौरी हिने ‘मन्नत’वर पार्टीचे आयोजन केले होते. ईदची सुरुवात आमच्याकडे परिवारातील सगळ्यांबरोबर नमाज पढण्यापासून होते. तशीच आजही झाली आहे आणि यावेळी अब्राम पण आमच्यासोबत असल्याने आपला आनंद द्विगुणित झाला असल्याची भावना त्याने व्यक्त केली.
आमिर, शाहरूखने ईद साजरी केली, सलमान मात्र परदेशात
दरवर्षी ईदला आमिर, शाहरूख आणि सलमान या बॉलिवूडच्या तिन्ही खानांच्या घरासमोर शुभेच्छा देणाऱ्या चाहत्यांची गर्दी होते. आज चेन्नई एक्स्प्रेसच्या निमित्ताने शाहरूखच्या मन्नतवर चाहत्यांची चांगलीच गर्दी झाली होती. आमिरन खानने आपल्या आईवडिलांच्या घरी ईद साजरी केली. गेल्यावर्षी ‘धूम’च्या निमित्ताने शिकागोत असलेल्या आमिरने तिथेच आपली ईद साजरी केली होती. यावर्षी मात्र त्याने ही ईद घरच्यांबरोबर साजरी करण्याची संधी घेतली. तर नेहमी ईदला आपल्या चित्रपटाच्या यशाचा ‘दंबग’ आनंद साजरा करणारा सलमान यावर्षी ‘किक’च्या निमित्ताने परदेशात आहे.
चेन्नई एक्स्प्रेस ९० टक्के फुल्ल!
ईदच्या मुहूर्तावर शाहरूखची मुख्य भूमिका असलेला ‘चेन्नई एक्स्प्रेस’ देशभर प्रदर्शित झाला आहे. दिवसाला देशभरातून ३५०० शो तर परदेशात ७०० च्यावर खेळ मांडणाऱ्या
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 10-08-2013 at 06:11 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chennai express 90 percent full