संजय दत्तच्या निर्मिती संस्थेसाठी चित्रपट दिग्दर्शन करण्याकरिता प्रभूदेवानंतर आता रोहित शेट्टीनेदेखील होकार दिला आहे. सू्त्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित शेट्टी संजय दत्तच्या निर्मिती संस्थेसाठी चित्रपट दिग्दर्शन करणार असून हा चित्रपट २०१६ साली प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. मात्र, चित्रपटाची कथा, विषय आणि कलाकार यांबाबतचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. रोहित शेट्टी आणि संजय दत्तने ‘ऑल द बेस्ट’ चित्रपटात एकत्र काम केले आहे.
रोहित शेट्टीने गोलमाल, सिंघम या चित्रपटांचे दिग्दर्शन केले असून शाहरुख-दीपिका अभिनीत ‘चेन्नई एक्स्प्रेस’ हा त्याचा चित्रपट ‘ईद’दिवशी ९ ऑगस्टला प्रदर्शित होत आहे.
१९९३ बॉम्बस्फोटप्रकरणी संजय दत्त पुण्याच्या येरवडा तुरुंगात शिक्षा भोगत असताना त्याच्या अनुपस्थितीत निर्मिती संस्थेचे काम त्याची पत्नी मान्यता दत्त सांभाळत आहे. सध्या, त्याची निर्मिती संस्था ‘हसमुख पिघल’ गया चित्रपटाची निर्मिती करत असून याचे दिग्दर्शन बॉलीवूडमध्ये नवीन पदार्पण करणारी दिग्दर्शक सेजल शाह करत आहे.

Story img Loader