आपल्या चित्रविचित्र कपड्यांमुळे नेहमीच चर्चेत असणारी सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद सगळ्याचं लक्ष वेधून घेत असते. अतंगरी कपड्यांमुळे तिला अनेकदा ट्रोलही केलं जातं. तिच्यावरील मीम्सही प्रचंड व्हायरल होत असतात. लोकप्रिय लेखक चेतन भगत यांनी उर्फीच्या कपड्यांवरुन तिच्यावर गंभार टीका केली आहे.
चेतन भगत यांनी ‘साहित्य आजतक २०२२’ या मुलाखतीत तरुण पिढीला पुस्तक वाचण्याचा सल्ला दिला. याबरोबरच त्यांनी उर्फी जावेदबाबत गंभीर वक्तव्यही केलं आहे. ते म्हणाले “इंटरनेट चांगली गोष्ट आहे. परंतु, देशातील तरुण पिढी सोशल मीडियावर फक्त रिल्स बघत असते. उर्फी जावेदचे फोटो लाइक करत असते. हा कोणत्या शिक्षणाचा भाग आहे का? तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये मला उर्फी जावेदचे सगळे कपडे माहीत आहेत, हे सांगणार आहात का? यात उर्फी जावेदची काहीच चूक नाही. ती तर तिचं करिअर बनवत आहे”.
हेही वाचा>> Video: “…हे मराठी माणसाचं वचन आहे”; शिव ठाकरेचे उद्गार ऐकताच रणविजयचे डोळे पाणावले, जुना व्हिडीओ व्हायरल
हेही वाचा>>Video: सोफ्यावर बसून अंकिता लोखंडेचा हॉट डान्स, नेटकरी म्हणतात “पवित्र रिश्ता…”
“एक सैनिक आहेत जे सीमेवर लढून देशाचे रक्षण करत आहेत. तर दुसरीकडे देशातील तरुण वर्ग रात्री बिछान्यात उर्फी जावेदचे फोटो बघत आहे. अशा तरुण वर्गाचं काय होणार? उर्फीने दोन मोबाइल फोन लावून कपडे घातले होते, हे मी पण आज पाहून आलो”, असंही पुढे चेतन भगत म्हणाले.
हेही वाचा>> ‘दृश्यम २’च्या भरघोस यशानंतर दिग्दर्शक चित्रपटाच्या तिसऱ्या भागाच्या तयारीत, म्हणाला “कथा तयार आहे पण…”
चेतन भगत यांनी उर्फी जावेदबाबत केलेल्या वक्तव्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.