अभिनेत्री छवी मित्तल मागच्या काही काळापासून स्तनाच्या कर्करोगाशी झुंज देत आहे. अलिकडेच तिनं यावर शस्त्रक्रिया करून घेतली. या बाबत तिनं नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. सोशल मीडियावर तिने तिच्या शस्त्रक्रियेनंतरचा एक फोटो शेअर करत खूपच भावुक पोस्ट लिहिली आहे. वयाच्या ४१ व्या वर्षी छवी मित्तल जीवघेण्या आजारीशी लढत आहे. मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना प्रेरणा देण्याचं काम देखील करताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

छवी मित्तलनं इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करताना लिहिलं, “मी जे सहन केलं ते कल्पनेच्या पलिकडचं होतं. आज मी जिमला गेले होते. पण मी माझ्या उजव्या हाताचा वापर अजूनही करू शकत नाही. मी प्रयत्न केला मात्र वजन उचलू शकले नाही. अगोदर मी स्क्वॅट्स, लंग्स, बल्गेरियाई स्प्लिट स्क्वॅट्स, सिंगल लेग स्क्वॅट्स आणि सूमो स्क्वॅट्स करायचे. पण आता ते शक्य नाही. पण मी आता याबाबत तक्रार देखील करू शकत नाही. मी तर आता माझ्या काखेतून दिसणाऱ्या या सर्जरीच्या व्रणाचंही काही करू शकत नाही. माझ्या डॉक्टरांना माझा अभिमान वाटतो आणि मला देखील.”

आणखी वाचा- “मी आनंद दिघेंच्या गेटअपमध्ये व्हॅनिटीमधून बाहेर पडलो अन्…” प्रसाद ओकने सांगितला ‘धर्मवीर’च्या सेटवरील किस्सा

छवीनं पुढे लिहिलं, “माझं म्हणणं आहे की मानसिकरित्या खंबीर झाल्याशिवाय आपण शारिरीकरित्या मजबूत होऊ शकत नाही. मी आज हे पाऊल उचलतानाही घाबरत होते. मी स्वतःला मानसिक शक्ती देण्यासाठी काही मिनिटांचा वेळ दिला. अखेर मेंदूचं ऐकल्याशिवाय आपण कृती करूच शकत नाही. त्यामुळे मानसिकरित्या खंबीर होणं महत्त्वाचं आहे.”

छवी मित्तलनं तिच्या या पोस्टमधून लोकांमध्ये स्तनाच्या कर्करोगाविषयी जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या पोस्टमध्ये तिनं शस्त्रक्रियेनंतर शरीरात झालेल्या बदलांविषयी सांगितलं आहे. तसेच या वेदनांतून जात असताना मानसिकरित्या जे सहन करावं लागलं ते सर्वात कठीण होतं असंही म्हटलं आहे.