अभिनेत्री छवि मित्तल सोशल मिडियावर चांगलीच सक्रिय असते. आपल्या दोन्ही मुलांसोबत तसचं फिटनेसचे अनेक व्हिडीओ ती शेअर करत असते. मात्र नुकतच एका नेटकऱ्याने छविला तिच्या बारीक असण्यावरून ट्रोल केलं होतं. या ट्रोलरला आता छविने सोडेतोड उत्तर दिलंय. छविने तिच्या इन्स्टाग्रामवर या युजरच्या कमेंटचा एक स्क्रीनशॉट शेअर करत भलीमोठी पोस्ट लिहिली आहे. यात छविने एखाद्याला जाडं म्हणणं जसं बॉडी शेमिंग आहे तसचं बारिक म्हणणं देखील बॉडी शेमिंग असल्याचं म्हंटलं आहे.
छवि मित्तलने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओला अनेकांच्या चांगल्या कमेंट आल्या होत्या. मात्र यातील एका कमेंटने छविचं लक्ष वेधून घेतलं. या युजरने छविला तिच्या बारीक असण्यावरून ट्रोल केलं होतं. कमेंटमध्ये युजर म्हणाली, ” कृपया वाईट वाटून घेऊ नको पण तू खूप सडपातळ दिसतेयस. तूझे हात बघ अगदी सापळ्या सारखे दिसत आहेत. खूप डायटिंगमुळे. मी पण एक डॉक्टर आहे. मला दोन मुली आहेत. मी सुद्धा फिटनेस प्रेमी आहे. मात्र प्लिज तू जो डाएट करतेस तो कुणालाही सुचवू नको.” अशी कमेंट या युजरने केली होती.
त्यानंतर आता छविने अब बस नावाच्या या युजरला उत्तर दिलंय. पोस्टमध्ये छवि म्हणाली, “डियर अब बस.. एका महिलेने दुसऱ्या महिलेला तिच्या शरीरावरुन सोशल मीडियावर अपमानित करू नये. माझे हात माझ्या मुलांसाठी आणि या समाजासाठी खूप काही करतात. ते त्याच्या वयाचे (जे ४० वर्ष आहे) दिसू शकतात किंवा त्याहून अधिक. मात्र ते कायम मला सुंदर दिसण्यासाठी मदत करतात.” असं छवि म्हणाली.
छवि पुढे म्हणाली, “एखाद्याला जाडं म्हणणं जिकतं अपमानजनक आहे तितकचं एखाद्याला बारीक म्हणणं. मातांनो कधी तुम्हाला बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला आहे?” असा प्रश्न छविने इतर मातांना विचारला आहे.
छवि अनेकदा तिचे वर्क आउटचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. या व्हिडीओत मुलांना आणि घर सांभाळत ती फिटनेसकडे कसं लक्ष देते हे चाहत्यांना सांगत असते. २००५ सालात छविने मोहित हुसेनसोबत लग्न केलं आहे. त्यांना अरीजा आणि अरहम ही दोन मुलं आहेत.