छोट्या पडद्यावरील ‘रंग माझा वेगळा’ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. अल्पावधीतच या मालिकेतील सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. या मालिकेत दिपा आणि कार्तिकच्या दोन्ही मुली दीपिका आणि कार्तिकी या चांगल्याच प्रसिद्धीझोतात आल्या आहेत. या मालिकेत कार्तिकीची भूमिका साकारणारी बालकलाकार साईशा भोईर हिने काही महिन्यांपूर्वी मालिका सोडली होती. रंग माझा वेगळा या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेली कार्तिकी म्हणजेच साईशा भोईर आता लवकरच झी मराठी वाहिनीवरील नव्या मालिकेत झळकणार आहे.

झी मराठी वाहिनीवर लवकरच एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नवा गडी नवं राज्य असे या नव्या मालिकेचे नाव आहे. या मालिकेत अभिनेत्री पल्लवी पाटील, कश्यप परुळेकर हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. त्यासोबतच बालकलाकार साईशा भोईर, वर्षा दांदळे आणि अनिता दाते हे कलाकारही या मालिकेत दिसणार आहेत. या नव्या मालिकेचा प्रोमो नुकतंच समोर आला आहे. यात अनिता दाते ही एका वेगळ्याच भूमिकेतून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. “जीव लावला की संसारातला प्रत्येक डाव जिंकता येतो…. त्या दोघींच्या संसाराची एक गोड गोष्ट….” असे खास कॅप्शन या प्रोमोला देण्यात आले आहे.

Rohit Sharma preparation for the Test series against New Zealand
Rohit Sharma : IND vs BAN टी-२० मालिका सुरु असतानाच रोहितने केलं असं काही की…VIDEO होतोय व्हायरल
19th October 2024 Rashibhavishya In Marathi
१९ ऑक्टोबर पंचांग: भरणी नक्षत्रात बहरणार प्रेमाची नाती,…
The AI dharma Story 25 October in cinemas
‘दि ए आय धर्मा स्टोरी’चे २५ ऑक्टोबरला प्रदर्शन
India vs Bangladesh T20 Series Updates in Marathi
IND vs BAN : भारत-बांगलादेश टी-२० मालिकेचे लाइव्ह स्ट्रीमिंग कधी आणि कुठे पाहता येणार? जााणून घ्या
success story of openai
कुतूहल : ‘ओपन एआय’ची वाटचाल
colors marathi new serial promo out five actresses in lead role
Bigg Boss संपल्यावर ‘कलर्स मराठी’वर नव्या मालिकांची नांदी! आणखी एक प्रोमो आला समोर; ५ अभिनेत्री एकत्र झळकणार
The team of Manawat Murders web series at Loksatta addaa
देशाला हादरवून सोडणाऱ्या हत्यासत्राचा थरार; ‘मानवत मर्डर्स’ वेबमालिकेचा चमू ‘लोकसत्ता’ कार्यालयात
tv series friends
मनोहर मालिका आणि…

‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील दीपिका आणि कार्तिकी एका भागासाठी घेतात इतके मानधन? जाणून घ्या

काही दिवसांपूर्वी साईशाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. त्यात तिने म्हटले की, साईशा लवकरच झी मराठीसोबत नवा प्रोजेक्ट सुरु करणार आहे. तुमचे प्रेम, आधार आणि दिलेले प्रोत्साहन हे आमच्यासाठी फार महत्त्वाचे आहे. हा प्रोजेक्ट सुरु असला तरी साईशा ही शाळेत जाणार आहे. ती दररोज शाळेत जाणार आहे आणि आठवड्याच्या शेवटी म्हणजेच वीकेंडला ती शूट करणार आहे.

९१ हजार फॉलोवर्स, सोशल मीडिया स्टार; ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील कार्तिकी नक्की कोण?

दरम्यान घरावर राज्य असणाऱ्या एकीचा अर्धवट राहिलेला संसार पूर्ण करायला दुसऱ्या बायकोवर आलेलं राज्य म्हणून या मालिकेचं नाव ‘नवा गडी नवं राज्य’ आहे असं ठेवण्यात आलं आहे. या मालिकेतून एक आगळावेगळा विषय पाहायला मिळणार आहे. ही नवी मालिका ८ ऑगस्ट २०२२ पासून रात्री ९.०० वाजता प्रसारित केली जाणार आहे.