प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’ या ऐतिहासिक चित्रपटानंतर आता लवकरच लवकरच त्यांचा आणखी एक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘शेर शिवराज’ असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. त्यानंतर आता या चित्रपटाचे नवे पोस्टर समोर आले आहे. अभिनेता चिन्मय मांडेलकरने सोशल मीडियावर हे पोस्टर शेअर केले आहे.
चिन्मय मांडेलकरने काही तासांपूर्वी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने त्याच्या आगामी शेर शिवराज या चित्रपटाचे नवीन पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये चिन्मय मांडेलकर हा पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. या पोस्टरच्या खाली ‘शेर शिवराज’ असे लिहिल्याचे पाहायला मिळत आहे.
चिन्मयने या पोस्टसोबत हटके कॅप्शनही दिले आहे. जावळीच्या जंगलाचा राजा एकच… तो म्हणजे, सह्याद्रीचा वाघ ‘छत्रपती शिवाजी महाराज’!, असे कॅप्शन चिन्मयने दिले आहे. त्यासोबत काही मिनिटांपूर्वी चिन्मयने या चित्रपटासंदर्भातील एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टद्वारे त्याने उद्या ‘शेर शिवराज’ या चित्रपटातील गाणे प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले आहे.
Video : भर मुलाखतीत चिन्मय मांडलेकरच्या एका कृतीने वेधलं लक्ष, दिग्पाल लांजेकर म्हणाले “हे पाहून…”
“मागतो मागणं उधळून भंडारा, पाईक आम्ही शिवबा राजांचे …’यळकोट देवाचा’ गोंधळ गीताचा लिरिकल व्हिडिओ येत आहे उद्या .!”, असे चिन्मयने या पोस्टमध्ये म्हटले आहे.
VIDEO: क्रिस रॉकने ६ वर्षांपूर्वी ऑस्करदरम्यान उडवली होती विल स्मिथच्या पत्नीची खिल्ली, म्हणाला “जॅडा ही…”
दरम्यान काही दिवसांपूर्वी दिग्पाल लांजेकर यांनी या चित्रपटाचा टीझर शेअर केला होता. ‘आदिलशाहीच्या जुलमी वरवंट्याखाली जेव्हा महाराष्ट्र भरडला, अन्याय निवारण्यासाठी तेव्हा कणाकणांतून बाहेर पडला, सहस्त्र हातांचा अजस्त्र नरसिंह… शेर शिवराज २२ एप्रिल २०२२…हर हर महादेव.’ असे त्यांनी म्हटले होते. ‘शेर शिवराज’ चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफझलखानाचा वध कसा केला हे पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट येत्या २२ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.