मागच्या काही दिवसांपासून मराठमोळा अभिनेता चिन्मय मांडलेकर सोशल मीडियावर सातत्यानं चर्चेत आहे. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटात चिन्मयनं ‘बिट्टा कराटे’ ही भूमिका साकारली आहे. ज्याची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे त्याआधी ‘पावनखिंड’ चित्रपटात तो ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांच्या भूमिकेत दिसला होता. या दोन्ही भूमिकांबाबत एका मुलाखतीत त्याला प्रश्न विचारण्यात आला. पण त्यावेळी असं काही घडलं की चिन्मयच्या एका कृतीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटात बिट्टाची भूमिका साकारणारा अभिनेता चिन्मय मांडलेकर नुकतंच एका वाहिनीला मुलाखत दिली. त्यावेळी त्या वाहिनीच्या मुलाखत घेणाऱ्या अँकरने चिन्मयचा परिचय देण्यास सुरुवात केली. यावेळी त्या अँकरने छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख शिवाजी असा केला. यावर चिन्मयने त्याला थांबवत छत्रपती शिवाजी महाराज असा उल्लेख करावा असे फार प्रेमळ शब्दात सांगितले. त्यावेळी त्याचे महाराजांबद्दल असलेले प्रेम पाहून चाहते भारावून गेले. नुकतंच याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
A Small girl amazing dance
“आईशप्पथ, नाद खुळा डान्स…”, ‘नमक इश्क का’ गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक
ladies group dance on manmohana tu raja swapnatala marathi song video goes viral on social Media
“मनमोहना तू राजा स्वप्नातला…” मराठमोळ्या गाण्यावर महिलांनी केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून आठवतील जुने दिवस
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
Little girl Dance
“काय भारी नाचते राव ही”, गोंडस चिमुकलीने केला जबरदस्त डान्स, Viral Video पाहून तिचे चाहते व्हाल
amazing Ukhana for wife
“आला आला वाघ…?” कोल्हापुरच्या रांगड्या नवरदेवाचा बायकोसाठी जबरदस्त उखाणा, VIDEO एकदा पाहाच
do you know which fort is this
हा कोणता किल्ला आहे, तुम्ही ओळखू शकता का? Viral Video एकदा पाहाच

आणखी वाचा- The Kashmir Files वर आर माधवनची प्रतिक्रिया चर्चेत; म्हणाला “मला खूप…”

चिन्मयनं या मुलाखतीचा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘कारण काही गोष्टी ‘Optional’ नसतात. कधीच. छत्रपती शिवाजी महाराज की जय.’ अनेकांनी या पोस्टवर लाइक आणि कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी हा व्हिडीओही आवडल्याचे कमेंटमध्ये म्हटले आहे. ‘यासाठी तुझा खूप अभिमान वाटतो’ असंही अनेक युजर्सनी चिन्मयला म्हटलं आहे.

आणखी वाचा- पत्नी जया बच्चनसमोर अमिताभ यांनी रेखा यांना लावला होता रंग, अन्…

दरम्यान काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या दिग्पाल लांजेकर यांच्या ‘पावनखिंड’ चित्रपटात चिन्मय मांडलेकरनं छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली होती. त्यानंतर ‘द कश्मीर फाइल्स’मध्ये त्यानं साकारलेली खलनायकी भूमिका ‘बिट्टा कराटे’ देखील सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहे.

Story img Loader