‘प्रभात चित्र मंडळ’ या आघाडीच्या फिल्म सोसायटीच्या वतीने ‘चित्रभारती’ भारतीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन २५ मेपासून नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात करण्यात येत आहे. गेल्या वर्षी राष्ट्रीय पारितोषिक विजेते ठरलेले भारतीय प्रादेशिक चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. लघुपट स्पर्धाही घेतली जाणार आहे. सोमवारी, सायंकाळी ५ वाजता सज्जीन बाबू दिग्दर्शित ‘अनटू द डस्क’ या मल्याळम चित्रपटाने महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.
२५ ते २७ असे तीन दिवस चव्हाण सेंटर येथे ‘मुक्ती’ (बंगाली), ‘बायसिकल किक’ (बंगाली), अदोम्या (आसामी), ‘ड्रीम झेड’ (इंग्रजी) आणि ‘क्रांतिधारा’ (उडिया) असे चित्रपट दाखविण्यात येतील. त्यानंतर २८ मे रोजी प्रभादेवीच्या पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या थिएटरमध्ये लघुपट स्पर्धेतून निवडलेले लघुपट दाखविण्यात येतील. २९ मे रोजी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या थिएटरमध्ये संध्याकाळी ‘चित्रभारती’ चित्रपट महोत्सवाचा सांगता समारंभ होणार आहे. यंदाच्या राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या ठरलेल्या मराठी चित्रपटांचे दिग्दर्शक, कलावंत यांचा सत्कार ‘प्रभात’तर्फे यावेळी केला जाणार आहे. या समारंभानंतर राष्ट्रीय पारितोषिक विजेते ‘एक हजाराची नोट’ आणि ‘मित्रा’ असे दोन चित्रपट दाखविण्यात येतील. अधिक माहितीसाठी २४१३१९१८ या क्रमांकाद्वारे अथवा prabhatchitramandal1@gmail.com या ई-मेलद्वारे संपर्क साधावा.
सोमवारपासून ‘चित्रभारती’ चित्रपट महोत्सव
‘प्रभात चित्र मंडळ’ या आघाडीच्या फिल्म सोसायटीच्या वतीने ‘चित्रभारती’ भारतीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन २५ मेपासून नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात करण्यात येत आहे.
First published on: 24-05-2015 at 01:00 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chithra bharathi tulu film festiva