भक्ती परब
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
काही मालिकांना प्रेक्षकांचं प्रेम इतकं भरभरून लाभतं, की त्या मालिका पुन:पुन्हा दाखवल्या गेल्या तरी प्रेक्षक त्या आवडीने पाहतात. डीडी नॅशनल म्हणजेच दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिनीवरील ‘रामायण’, ‘महाभारत’, ‘जय हनुमान’, ‘शक्तीमान’ आदी लोकप्रिय मालिका काही सशुल्क वाहिन्यांवर आजही पुन:प्रसारित केल्या जातात. अलीकडचं एक ताजं उदाहरण घ्यायचं झालं तर ‘प्यार तुने क्या किया’ ही मालिका ‘झिंग’ टीव्हीवर इतकी गाजली, की मालिकेची आतापर्यंत ९ पर्वे सादर झाली आहेत. त्यातील काही भाग दररोज प्रसारित केले जातात आणि गमतीची गोष्ट म्हणजे या मालिकेच्या जोरावर ही वाहिनी युथ चॅनल्स विभागात इतर वाहिन्यांना मागे टाकून पहिल्या क्रमांकावर विराजमान होते.
प्रेक्षकांचे असे प्रेम जिथे भरभरून मिळते, तिथेच काही वेळा प्रेक्षकांच्या रोषालाहीसामोरे जावे लागते. गेल्या आठवडय़ात एका लोकप्रिय वाहिनीवरील सध्या लोकप्रिय असलेल्या मालिकेत वहिनी आणि दीराच्या नात्याविषयी काही टोकाचे प्रसंग दाखवण्यात आले. हे प्रेक्षकांना अजिबात रुचले नाही. कारण काय तर त्या मालिकेतील जोडी प्रेक्षकांना इतकी आवडलीये की त्या दोघांमध्ये तिसरा कुणी आणू नका म्हणून ऑनलाइन प्रेक्षकांच्या दबावगटाने थेट त्या वाहिनीच्या प्रमुखांनाच विनंती केली. मग त्या वाहिनीच्या प्रमुखांनी नमते घेऊ न, त्या मालिकेतील प्रेक्षकांना न रुचलेले ते वळण पटकन गुंडाळण्यात आले, त्यानंतर ऑनलाइन प्रेक्षकांनी त्या वाहिनीप्रमुखांचे आभारही मानले. प्रेक्षकांच्या प्रेमाचे असे अनेक दाखले दैनंदिन मालिकांच्या लोकप्रिय जोडय़ांच्या बाबतीत वारंवार घडत असतात.
त्यामुळे प्रेक्षकांचा वचक आहे, हेही सिद्ध होतं.
माहिती, ज्ञान आणि मनोरंजन यांनी परिपूर्ण असलेल्या एपिक वाहिनीवर ‘द क्रिएटिव्ह इंडियन्स’, ‘रेजिमेंट डायरीज’, ‘राजा रसोई और अन्य कहानिया’, ‘रोड लेस ट्रॅव्हल्ड’, ‘त्यौहार की थाली’ यांचे पुन:प्रसारित भाग दाखविले जात आहेत. तसेच ‘राजा रसोई और अंदाज अनोखा’ या कार्यक्रमाचं दुसरं पर्व सुरू आहे. ‘एफवायआय १८’ या वाहिनीवर लग्नाच्या गोष्टी दाखवण्यात येत आहेत. प्रत्येक लग्न हे खास असतं आणि प्रत्येक लग्नाची सुंदर अशी एक गोष्ट असते. २० एप्रिलपासून शनिवार आणि रविवारी रात्री ८ वाजता ‘अवर वेडिंग स्टोरीज’ हा कार्यक्रम पाहता येईल. या कार्यक्रमात काही जोडपी त्यांच्या लग्नाची गोष्ट सांगणार आहेत. काही जोडप्यांच्या लग्नाची गोष्ट एखादा प्रेमकथा असलेला चित्रपट पाहतोय, अशा पद्धतीने या कार्यक्रमाची मांडणी करण्यात आली आहे.
‘हिस्ट्री टीव्ही १८’ या वाहिनीवरील गाजलेला कार्यक्रम ‘क्रेझी व्हील्स’चे दुसरे पर्व २५ एप्रिलपासून सुरू होत आहे. लोकप्रिय निवेदक राघव जुयाल त्याच्या अनोख्या अंदाजात पुन्हा एकदा या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. आजच्या तरुणाईला डोळ्यासमोर ठेवून या कार्यक्रमाची रचना करण्यात आलीय. ‘तुमसे ना हो पायेगा’ अशी या पर्वाची संकल्पना आहे. ‘फूड फूड’ या वाहिनीचा बराचसा प्रेक्षक आता ‘लिव्हिंग फूड्ज’ या वाहिनीकडे वळला आहे. सध्या या वाहिनीवर कार्यक्रमांचं सादरीकरण इतकं भारी होतंय की, प्रेक्षक दैनंदिन मालिका बघायचे सोडून ‘दक्षिण डायरीज’ आणि ‘नॉदर्न फ्लेवर्स’ हे दोनच कार्यक्रम बघत राहतील, असं दिसतंय. या दोन कार्यक्रमांना प्रेक्षकांचं प्रेम भरभरून मिळतंय. दक्षिण भारत आणि त्याच्या छोटय़ात छोटय़ाशा भागांमध्ये वसलेली खाद्यसंस्कृती ‘दक्षिण डायरीज’ या कार्यक्रमात पाहता येतेय. नव्या खाद्यपदार्थाबरोबर तिथल्या संस्कृतीशी जोडलेल्या गोष्टींचं आजही प्रत्येकाला कुतूहल आहे. त्यामुळे पाककृतींची ही भन्नाट भ्रमंती पाहावीशी वाटते.
या वाहिनीवर प्रसिद्ध शेफ अजय चोप्रा पाककृतींसोबत जोडल्या गेलेल्या लग्न गोष्टींचा खजिना घेऊन आले आहेत. ‘नॉदर्न फ्लेवर्स’ या त्यांनी निवेदन केलेल्या कार्यक्रमाचे १५ एप्रिलपासून तिसरे पर्व ‘नॉदर्न फ्लेवर्स शुभ विवाह’ नावाने सुरू झाले आहे. त्यामध्ये पाककृती आणि त्याचबरोबर भारताच्या विविध भागांतील लग्नगोष्टी ते सांगतात. एखादी विशिष्ट पाककृती लग्नासोहळ्यात का वाढली जाते, त्यामागे काय कथा आहे, हे ते रंजक पद्धतीने सांगत आहेत. ‘रिटर्न टू द मून : सेकंड्स टू अरायव्हल’ या एक तासाच्या विशेष कार्यक्रमामधून डिस्कव्हरी वाहिनी चंद्रप्रवासाचा वेध घेणार आहे. सोमवारी २२ एप्रिलला रात्री १० वाजता हा विशेष भाग पाहता येईल.
मराठी मालिकांमध्ये ‘माझ्या नवऱ्याची बायको’, ‘तुझ्यात जीव रंगला’, ‘स्वराज्यरक्षक संभाजी’, ‘चला हवा येऊ द्या’, ‘झिंग झिंग झिंगाट’ या झी मराठीच्याच पाच मालिका पहिल्या पाच क्रमांकावर आहेत. सध्या ‘स्टार स्पोर्ट्स’ हिंदी ही वाहिनी जास्तीत जास्त पाहिली जात असून त्याचबरोबर ‘दंगल टीव्ही’, ‘बिग मॅजिक’, ‘सन टीव्ही’ या वाहिन्यासुद्धा मोठय़ा प्रमाणात पाहिल्या जात आहेत; पण काहीही म्हणा, ‘प्यार तुने क्या किया’ म्हणजेच लाडाने ‘पीटीके के’ म्हणून ओळखली जाणाऱ्या मालिकेला तोड नाही. ती नेटफ्लिक्सवरही दाखवली जात आहे. हिंदी मालिकांमध्ये मुख्य नायिक-नायिकेची भूमिका मिळण्यासाठी कलाकारांना ‘पीटीके के’च्याच मांडवाखालून जावं लागतं. त्यांच्या प्रेक्षकप्रेमाला इथूनच सुरुवात होते.