अभिनेत्री आणि दिग्दर्शिका चित्रा पालेकर यांचे ‘हॅपी जर्नी’ या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून दीर्घ कालावधीनंतर पुन्हा रूपेरी पडद्यावर आगमन होत आहे. या चित्रपटात चित्रा पालेकर एका वेगळ्या आणि धमाल भूमिकेत प्रेक्षकांच्या समोर येणार आहेत.
अमोल पालेकर दिग्दर्शित ‘आक्रित’ हा चित्रा यांचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटाची निर्मितीही त्यांची होती. त्यानंतर ‘थोडासा रुमानी हो जाए’, ‘कैरी’, ‘कल का आदमी’, ‘ध्यासपर्व’ या चित्रपटांची पटकथा-संवाद त्यांनी लिहिले होते. ‘बनगरवाडी’, ‘दायरा’ या चित्रपटांसाठी त्यांनी अतिरिक्त पटकथालेखिका म्हणून काम पाहिले होते. ‘माटीमाय’ या चित्रपटाद्वारे त्यांनी दिग्दर्शिका म्हणून सुरुवात केली. ‘हॅपी जर्नी’ या चित्रपटाची कथा आवडल्याने आपण हा चित्रपट स्वीकारल्याचे त्या म्हणाल्या.

Story img Loader